AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune metro : पुण्यात ‘या’ मेट्रो स्थानकांवर पीएमपीची सेवा; मेट्रो ॲपवरून तिकीट बुक करता येणार

मेट्रोची सेवा गरवारे कॉलेज ते वनाज दरम्यान सुरू आहे. यापैकी पीएमपी प्रशासनाने मेट्रोच्या गरवारे व आनंद नगर या दोन मेट्रो स्टेशनला फिडर देण्याचे निश्चित केले आहे. या दोन स्थानकांच्या परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत आणण्याचे काम पीएमपी करणार आहे.

Pune metro : पुण्यात 'या' मेट्रो स्थानकांवर पीएमपीची सेवा; मेट्रो ॲपवरून तिकीट बुक करता येणार
Pune Metro Image Credit source: TV9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 13, 2022 | 4:27 PM
Share

पुणे- शहरात मेट्रोचा 12  कि.मी प्रवासाचा मार्ग नुकताच सुरु झाला आहे. गरवारे कॉलेज ते वनाज(Garware College to Vanaj) या मार्गावरील या मेट्रोला नागरिकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मेट्रो तिकिटासाठी ‘मेट्रो ॲप’ची (Metro App) निर्मिती केल्यानंतर,  आता पीएमपी(PMP) व मेट्रोच्या तिकिटासाठी एकच ॲपचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे फिडर सेवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. पीएमपी पुणे महापालिकेच्या क्षेत्रात दोन तर पिंपरी चिंचवडच्या क्षेत्रात चार मेट्रो स्थानकांवर ही फिडर सेवा दिली जाणार आहे. उद्या (सोमवारी) यावर पीएमपी व पुणे मेट्रो प्रशासनाची बैठक होऊन त्यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

या स्थानकांवर मिळणार सेवा

मेट्रोची सेवा गरवारे कॉलेज ते वनाज दरम्यान सुरू आहे. यापैकी पीएमपी प्रशासनाने मेट्रोच्या गरवारे व आनंद नगर या दोन मेट्रो स्टेशनला फिडर देण्याचे निश्चित केले आहे. या दोन स्थानकांच्या परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत आणण्याचे काम पीएमपी करणार आहे. कोणत्या रस्त्यावरून अथवा बसथांब्यावरून प्रवासी घेऊन जायचे याचा अभ्यासदेखील पीएमपीच्या वाहतूक विभागाने केला आहे. मेट्रो प्रशासनाने अन्य स्थानकांची नावेदेखील पीएमपीला सुचविले. मात्र, त्या ठिकाणाहून मेट्रो स्टेशनला येणे पीएमपीसाठी अवघड वाटत असल्याने पीएमपीने गरवारे व आनंद नगर स्थानकांसाठी फिडर सेवा देण्याचे मान्य केले. ‘गरवारे व आनंद नगर स्टेशन वरून पीएमपीने प्रवास करत असताना प्रशासन फिडर सेवा देणार आहे. प्रवाशांना पीएमपी व मेट्रोची तिकिटे एकाच ॲपमधून मिळावे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच या तिकीटाचा दारा निश्चित होणार आहे.

Holi 2022 : होळी खेळल्यानंतर रंग लगेच कसे घालवायचे? ‘हे’ घरगुती उपाय करुन पहा

ओवेसींची एमआयएम भाजपची ‘बी’ टीम सिद्ध होतेय का, यूपीतल्या ह्या जागांवरचे निकाल तरी बघा…!

Shane Warne Death Case: ‘शेन वॉर्नला असं वाटत होतं की…’ त्याच्या काऊन्सलरने उघड केली गुपितं

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?