AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Utsav 2023 | पुणे शहरात पीएमपीएमएल बसेस रात्रभर राहणार सुरु, गणेशोत्सवासाठी वाढवला बंदोबस्त

Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव सुरु होण्यास तीन दिवस राहिले आहे. सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. आता प्रशासनाकडून गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. त्याचवेळी पुणे शहरातील बसेस रात्रभर सुरु ठेवण्यात येणार आहे.

Ganesh Utsav 2023 | पुणे शहरात पीएमपीएमएल बसेस रात्रभर राहणार सुरु, गणेशोत्सवासाठी वाढवला बंदोबस्त
PMPMLImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 16, 2023 | 10:20 AM
Share

पुणे | 16 सप्टेंबर 2023 : गणेश उत्सवाची जोरदार तयारी पुणे शहरात सुरु आहे. गणेश मंडळांचे आरास तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही आरास पाहण्यासाठी रात्रभर गर्दी होते. त्यामुळे गणेश उत्सवासाठी पीएमपीएल जादा बसेस सोडणार आहे. एकूण 270 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान शहरात जादा बसेस धावणार आहेत. तसेच गणेशोत्सव दरम्यान पीएमपीएमएलच्या बसेस रात्रभर सेवा देणार आहे. यामुळे भाविकांची सुविधा होणार आहे.

पुणे गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज

पुणे शहरात गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे शहरात 7000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 5000 पोलीस कर्मचारी आहेत. तसेच गुन्हे शाखेचे पथक आहे. बाहेर गावावरून 1300 पोलीस कर्मचारीसुद्धा शहरात तैनात असणार आहे. गणेशोत्सव दरम्यान दिवसभरातून चार वेळा बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तपासणी करणार आहे.

पुणे रेल्वे विभागात मालवाहतूक वाढली

पुणे रेल्वे विभागाने दमदार कामगिरी केली आहे. पुणे विभागातून रेल्वेला 44 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागातून ऑगस्टमध्ये 167 मालगाड्या धावल्या होत्या. पुणे विभागात प्रवाशी वाहतुकीबरोबर मालवाहतुकीला प्रतिसाद वाढत आहे. अनेक उद्योजक रस्ते वाहतुकीपेक्षा मालवाहुकीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पुणे विभागाची मालवाहतूक वाढली आहे.

नगर रस्तावरील बीआरटीचा अभ्यास होणार

नगर रस्त्यावर अभ्यासासाठी गोखले इन्स्टिट्यूटची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीस बीआरटीचा मार्ग जबाबदार असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी आता गोखले इन्स्टिट्यूटची नियुक्ती केली आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी या संस्थेला दिली असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेपासून ते खराडी जकात नाक्यापर्यंत बीआरटी मार्गाची अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मोहन भागवत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते केली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी दहा वाजून 23 मिनिटांनी दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता श्रींच्या आगमन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दगडूशेठ मंडळाने यंदा आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती बनवली आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.