leopard : बिबट्या आला, अन् काय घेऊन गेला, वाचल्यावर बसेल तुम्हालाही धक्का

Pune leopard : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बिबटे अनेक ठिकाणी वास्तव करुन आहेत. हे बिबटे मानवी वस्तीकडे येत असतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असते. परंतु बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

leopard : बिबट्या आला, अन् काय घेऊन गेला, वाचल्यावर बसेल तुम्हालाही धक्का
leopard
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 4:00 PM

पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात बिबट्याचे दर्शन अधूनमधून होत असते. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिक बिबट्याच्या भीतीने भयभीत असतात. निरगुडसर येथील रहिवाशी रामदास वळसे पाटील यांच्या घरात बिबट्या आला. बराच वेळ तो व्हरांड्यात शिकारीच्या शोधात थांबला होता. परंतु त्याला काही शिकार मिळाली नाही. बराच वेळ थांबल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर त्याचा व्हिडिओ समोर आला. बिबट्याने केलेल्या करामतीमुळे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय केले बिबट्याने

हे सुद्धा वाचा

बिबट्या रामदास पाटील यांच्या व्हरांडत बराच वेळेपर्यंत थांबला. परंतु त्याला शिकार मिळाले नाही. तरीही तो निराश झाला नाही. मग त्याने चक्क चप्पल चोरून नेली. बिबट्याच्या या कृत्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बिबटे मानवी वस्तीत

आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबटे आहेत. हे बिबटे मानवी वस्तीत येत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर बिबट्यापासून बचावासाठी भिंती उभारल्या आहेत. मात्र अनेकदा बिबट्या भिंतीवरून चढून बिबटे येत असतात. निरगुडसर येथे रामदास पाटील यांच्या घराबाहेर बिबट्या शिकारीच्या शोधता आला. पण त्याला शोधूनही शिकार मिळाली नाही. अखेर त्याने घराच्या व्हरांड्यात असलेल्या शेतकऱ्याची चप्पलच पळवून नेली.

जंगलातून बिबट्या थेट रस्त्यावर आला

विकास आणि वाढत्या शहरीकणाच्या हव्यासापोटी माणसाने जंगले नष्ट केली. आपण रोज शेकडो झाडांची कत्तल करतो. याच कारणामुळे आता जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. सध्या दिसणाऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये तर एक बिबट्या थेट घरात आला आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.