AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Cirme News | आई, वडिलांनीच मुलीला विकले, विकत घेणाऱ्याने असे काही केली की…

Pune Cirme News | पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आई-वडिलांनी थोड्या पैशांसाठी आपल्या मुलीला विकले. मुलीला दत्तक देत असल्याचे ५०० रुपायांच्या स्टँप पेपरवर लिहून दिले. परंतु ज्याने त्या मुलीस घेतले, त्याने असा काही प्रकार सुरु केला की...

Pune Cirme News | आई, वडिलांनीच मुलीला विकले, विकत घेणाऱ्याने असे काही केली की...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 14, 2023 | 4:26 PM
Share

पुणे | 14 सप्टेंबर 2023 : आई-वडील आपला मुलगा किंवा मुलगीसाठी सर्व कष्ट सहन करण्याची तयारी ठेवता. आपल्या लाडक्या छकुलीला आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु काही महाभाग यापेक्षा वेगळे निघतात. पुणे शहरात राहणाऱ्या एका जोडप्याने आपल्या मुलीस ओळखीच्या लोकांना विकले. मुलगी दत्तक देत असल्याचे स्टॅप पेपरवर लिहून दिले. मग ज्याने त्या मुलीस घेतले त्याने तिला भीक मागण्यास बसवले. एका वकिलाच्या जागृकतेमुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडला प्रकार

पुणे शहरातील एका दाम्पत्यास सहावी मुलगी झाली. मग त्यांनी त्या मुलीस फक्त दोन हजार रुपयांमध्ये परिचित व्यक्तीला विकले. विकत घेताना स्टँप पेपर तयार केला. त्यात मुलीला दत्तक देत असल्याचे लिहून दिले. कुठेही मुलीस विकत देत असल्याचे म्हटले नाही. त्या लोकांनी मुलीस विकले तेव्हा ती फक्त दोन वर्षांची होती. त्यानंतर ज्याने विकत घेतले त्याने त्या मुलीस भीक मागण्याच्या कामाला लावले. आता ती चार वर्षांची झाली आहे. त्या मुलीस विकण्याचा व्यवहार समाजातील पंच मंडळीच्या साक्षीने झाला होता.

हा प्रकार वकिलांपर्यंत गेला अन्…

त्या चार वर्षीय मुलीची कहाणी वकील शुभम लोखंडे यांना कळाली. त्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दत्तक घेणारे आणि आपल्या मुलीस विकणाऱ्या आई-वडिलांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला. भारतीय दंड विधान 363 अ, 370 (मानव तस्करी), 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

काय म्हणतात पोलीस

पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले की, मुलगी विकणारे आणि विकत घेणारे एकमेकांना चांगलेच ओळखत होते. मुलीस दत्तक घेताना त्यांनी ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून दिले होते. परंतु नोटरीमध्ये विक्री रक्कमेचा उल्लेख नव्हता. दत्तक घेण्याची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेचे कोणतेही पालन त्यांनी केले नव्हते. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?