Pune corona : चौथ्या टप्प्यातील लसीकरण, महापौरांनाही लस, 15 लाख नागरिकांना लस देण्याचं टार्गेट

पुण्याचे प्रथम नागरीक महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनीही आज लस घेतली. आत्तापर्यंत 3 लाख 60 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे.

Pune corona : चौथ्या टप्प्यातील लसीकरण, महापौरांनाही लस, 15 लाख नागरिकांना लस देण्याचं टार्गेट
Pune Mayor Murlidhar Mohol

पुणे : पुण्यात आजपासून चौथ्या टप्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. 45 वर्षांवरील सरसकट नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यात पुण्याचे प्रथम नागरीक महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनीही आज लस घेतली. आत्तापर्यंत 3 लाख 60 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर या चौथ्या टप्प्यात 15 लाख नागरिकांना लस देण्याची तयारी पालिकेने केली आहे. आत्तापर्यंत लसीकरणाच्या मोहिमेला पुण्यात (Pune vaccination centers) चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पात्र असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. (Pune corona and vaccination update)

दरम्यान 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात असताना, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. असं असलं तरी अजूनही ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. पुण्यात लसीच्या डोसची कमतरता नाही, शिवाय ती सुरक्षित असल्याचं लसीकरण केंद्र प्रमुखांनी सांगितलं.

महापौरांना लस 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज लस देण्यात आली. कोथरूडच्या सुतार दवाखान्यात ही लस देण्यात आली. यावेळी शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्वांनी लसीकरणात सहभाग नोंदवला पाहिजे असं आवाहन यावेळी महापौरांनी केलं.

राज्य सरकारने 500 कोटींची मदत करावी : खासदार गिरीश बापट

कोरोनाच्या सुरुवातीपासून केंद्र सरकारच्यावतीने पुणे शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली आहे.आत्तापर्यंत 2800 कोटी एवढी मदत करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून काहीही मदत करण्यात आलेली नाही. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरदेखील महापालिका चालवत आहे. कोरोनाच्या या संकटात राज्य सरकारने पुणे महापालिकेला 500 कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली आहे.

पुणे देशात अव्वल

सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेलं पुणे शहर कोरोनाच्या समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी 6 ते 8 हजार कोरोना बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमधून काळजी व्यक्त केली जातेय. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगत कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत.

महापालिका शहरातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार

पुणे शहरात सध्या जवळपास सरकारी आणि खासगी सर्व रुग्णायलातील बेड फुल्ल झालेत. त्यामुळं महापालिका शहरातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेतीये. तसे आदेशही महापालिकेनं खासगी हॉस्पिटलला दिलेत. पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली.

Pune corona and vaccination update

 संबंधित बातम्या 

Pune Corona Update : पुणे देशात अव्वल, समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर

Published On - 12:52 pm, Thu, 1 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI