पुण्यात दोन बसची टक्कर, एकमेकांना घासल्या गेल्या, काचा फुटल्या आणि…

पुण्यात अपघाताची एक घटना समोर आलीय. या अपघातात दोन बसचं नुकसान झालंय.

पुण्यात दोन बसची टक्कर, एकमेकांना घासल्या गेल्या, काचा फुटल्या आणि...
| Edited By: | Updated on: Nov 11, 2022 | 10:20 PM

पुणे : पुण्यात अपघाताची एक घटना समोर आलीय. या अपघातात दोन बसचं नुकसान झालंय. अपघातानंतर संबंधित परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले. तसेच स्थानिक नागरीक मदतीसाठी पुढे धावले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय.

पुण्यात हडपसर जवळ दोन पीएमटी बसचा अपघात झालाय. हडपसर परिसरातील गाडीतळ जवळ दोन पीएमपी बस एकमेकांना घासल्या गेल्या.

सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. वाघोलीकडे जाणारी बस सिग्नलला थांबली असता संबंधित घटना घडली.

या अपघातात दोन्ही बसच्या काचा फुटल्या असून इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. या दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत देखील झाली नाही.