दौंड, पुणे : औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे, मनसेचे (MNS) राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे, जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर होते. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि भोंग्याचा राजकारणामुळे मनसेमधील मुस्लीम कार्यकर्ते राजीनामा देत असल्याचे यावरून दिसून येत आहे. वाहतूक सेनेचे अध्यक्षपद, पुणे जिल्हा कामगार सेना एसटी महामंडळाच्या सदस्य पदावर होतो, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर आम्ही नाराज असल्याचे सांगत राजीनामा दिल्याचे सय्यद यांनी सांगितले आहे.