pune news | काय…चक्क माशांची चोरी…पोलीस करणार तपास
Pune crime News | पुणे जिल्ह्यात माशांची चोरी झाली आहे. ही चोरी लाखो रुपये किंमतींची आहे. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस माशांच्या या चोरी प्रकरणाचा तपास करणार आहे.

पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्यात चोरीची वेगळी घटना घडली आहे. पुणे येथील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे माशांची चोरी झाली आहे. हिंगणगाव येथील शासनाच्या मत्स्य बीज केंद्राच्या तलावातून तब्बल पाऊणे दोन लाख रुपयांचे वेगवेगळ्या जातीचे मासे चोरीला गेले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा तीन जणांच्या विरोधात दाखल झाला आहे. आता इंदापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहे.
पुणे जिल्ह्यातील इतर बातम्या
पुणे डीजे विरोधात न्यायालयात याचिका?
पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेमुळे आवाज चांगलाचा वाढला होता. आवाजाविरोधात पुण्यातील नेते उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. पुणे येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात येणार आहे. डिजे विरोधात कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. माजी महापौर अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यातील 30 शिक्षणाधिकारी येणार अडचणीत
राज्यातील 30 प्राथमिक शिक्षणाधिकारी अडचणीत येणार आहे. कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अनुदान अन्यत्र वापरले. संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन नियम धुडकावल्यामुळे दोषारोपपत्र बजाविण्यात आले आहेत. या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई बाबतचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत शिक्षण आयुक्तालयाकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळे आता शिक्षणाधिकारी अडचणीत आले आहे.
संभाजी भिडेविरोधात याचिकेवर युक्तीवाद
संभाजी भिडे यांच्यावर तुषार गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुणे न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला आहे. पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे. संभाजी भिडे यांनी महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा त्यांचावर आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध तुषार गांधी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गांधी यांच्याकडून दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली नाही. यामुळे ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत तुषार गांधी यांनी शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल केली.
पुणे येथे सामजिक सुरक्षा विभागाची छापेमारी
पुण्यातील बुधवार पेठेत सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी केली आहे. यावेळी सात बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. बुधवार पेठेत राहणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाईची सामाजिक सुरक्षा विभागाची एक महिन्यात ही तिसरी वेळ आहे. बांगलादेशी महिलांकडे भारतात येण्याचा व्हिसा नव्हता. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेलाही सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली.
