AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lalit Patil | ललित पाटील नव्हे तर हा होता ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट, फरार झाल्यानंतर कसा फिरला ललित पाटील

Pune lalit patil drug case | पुणे येथील ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला होता. त्याला बुधवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी ड्रग्सचा हा व्यवहार कसा सांभाळला होता...

lalit Patil | ललित पाटील नव्हे तर हा होता ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट, फरार झाल्यानंतर कसा फिरला ललित पाटील
Bhushan Patil and Lalit PatilImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 20, 2023 | 11:35 AM
Share

पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून हॉस्पिटलमधील ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे प्रकरण उघड केले. परंतु त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली. तसेच पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. पुणे, मुंबई, नाशिक पोलीस एकाच वेळी ललित पाटील याचा देशभर शोध घेत होते. त्यावेळी भूषण पाटील याला अटक करण्यात आली.

भूषण पाटील हाच सूत्रधार

भूषण पाटील हाच ड्रग्स प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहे. तो केमिकल इंजिनीअर आहे. त्यामुळे त्याला रसायनशास्त्राचे चांगलेच ज्ञान होते. यामुळे तोच एमडी ड्रग्स तयार करत होता. त्याला नाशिक येथील आणि सध्या ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या अरविंदकुमार लोहारे याने एमडी ड्रग्स बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. ड्रग्स तयार करण्याचे काम भूषण पाटील करत होते तर ते ड्रग्स विकण्याचे काम ललित पाटील करत होता. तसेच अभिषेक बलकवडे हा आर्थिक व्यवहार पाहत होता.

बंद कारखान्यात टाकला ड्रग्सचा बाजार

भारतात एमडी ड्रग्स विदेशातून येते. परंतु रसायन शास्त्राची माहिती असलेल्या भूषण पाटील याच्याकडे ड्रग्स बनवण्यासाठी एक टीम होती. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती तर १८ ऑक्टोबर रोजी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

ललित पाटील कसा फिरला

पुणे येथील फरार झाल्यानंतर ललित पाटील आधी चाळीसगावात दाखल झाला. त्यानंतर धुळ्याला पोहचत भाड्याने वाहन घेतले. तेथून छत्रपतीसंभाजीनगर मार्गे गुजरातमधील जामनगर येथे गेला. त्यानंतर सोलापूर येथे दाखल झाला. पुढे विजापूरवरुन कर्नाटक गाठले. कर्नाटकातून चेन्नईला जाण्याचा त्याचा बेत होता. चेन्नईवरुन तो श्रीलंकेत दाखल होणार होता. परंतु त्यापूर्वी मुंबई पोलिसांना तो मिळाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.