AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा, मदत म्हणून मिळणार ‘इतके’ रुपये

पुण्यातील अनेक घरं, दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. सध्या पुणेकर या भीषण स्थितीतून सावरत आहेत. त्यातच आता पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा, मदत म्हणून मिळणार 'इतके' रुपये
| Updated on: Aug 09, 2024 | 4:48 PM
Share

Pune Flood Victim Help :  गेल्या आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाले. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे पुण्यातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली. पुण्यातील अनेक घरं, दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. सध्या पुणेकर या भीषण स्थितीतून सावरत आहेत. त्यातच आता पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यातील पूरग्रस्तांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये आलेल्या पुरात ज्यांचे कोणाचे नुकसान झाले आहे, त्यातील प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, असेही सुहास दिवसे यांनी म्हटले.

त्यासोबतच पुण्यातील पूर स्थितीसाठी कारणीभूत ठरलेली अनेक अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहेत. याबद्दलची सर्व रुपरेषा नव्याने आखली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकषही शिथिल करण्यात आले आहेत. जर पूरस्थितीत पुराचे पाणी दोन दिवस घरात साचून राहिले असेल तरच मदत मिळेल, असे आदेश महसूल मंत्र्‍यांनी दिले होते. पण आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यासह पुण्यातील पूरग्रस्त मदतीची रक्कम प्रतिकुटुंब पाच हजारांवरून दहा हजार रुपये करण्यात आली आहे. याशिवाय नुकसानग्रस्तांमध्ये दुकानदार आणि टपरीधारक यांचाही समावेश करण्यात आला आहे. नुकतंच याबद्दलचा नवीन आदेशही प्रसिद्ध करण्यात आला.

एकूण किती मिळणार मदत?

पुण्यात पुराचे पाणी शिरलेल्यांना प्रतिकुटुंब पाच हजारांऐवजी दहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने याबद्दलची घोषणा केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत करण्याचे निर्णय घेतला आहे.

स्थानिक रहिवासी, शिधापत्रिकाधारक, मतदारयादीत नाव असलेले आणि नोंदणीकृत परवानाधारक दुकानदार आणि टपरीधारकांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा कमाल 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...