भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींकडून मारहाण, पुणे पोलिसात तक्रार

तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे (Pune Medha Kulkarni allegedly beaten up)

भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींकडून मारहाण, पुणे पोलिसात तक्रार
माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी

पुणे : कोथरुडच्या माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलकर्णींनी मारहाण केल्याचा आरोप करत कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Pune former MLA Medha Kulkarni allegedly beaten up Police complaint file)

कोथरुड भागातील रामबाग कॉलनीत असलेल्या अनधिकृत जागेत ऊसाचे गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचा दावा गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र आता कुलकर्णींवरच मारहाणीचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जून महिन्यात मेधा कुलकर्णींवरही हल्ला

दरम्यान, जाब विचारल्याच्या रागातून जून 2020 मध्ये पुण्यात कोथरुड परिसरातील सहजानंद सोसायटीजवळ दारु पिण्यास बसलेल्या युवकांनी मेधा कुलकर्णींसह तिघांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. दारुड्यांनी सुरुवातीला सहजानंद सोसायटीतील रहिवासी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला होता.

विलास कोल्हे कुत्र्याला घेऊन बाहेर गेले होते. त्यावेळी दारुड्यांनी आमच्यावर कुत्रा का सोडता, असं विचारत मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार मेधा कुलकर्णी घटनास्थळी आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला होता. हल्ल्यात कुलकर्णी यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली होती.

मेधा कुलकर्णी कोण आहेत?

मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं. (Pune former MLA Medha Kulkarni allegedly beaten up Police complaint file)

विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते. पुणे पदवीधर मतदारसंघातूनही मेधा कुलकर्णींना डावलण्यात आलं होतं.

मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला, हाताची बोटे फ्रॅक्चर

ना मला पक्षाचा निरोप, ना बैठकांचं निमंत्रण, विधानपरिषदेची संधीही नाही, मेधा कुलकर्णींची अप्रत्यक्ष नाराजी

(Pune former MLA Medha Kulkarni allegedly beaten up Police complaint file)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI