गणपती बाप्पा मोरया..! पुण्यातील गणेश मंडळांना पाच वर्षांचा परवाना; दगडूशेठ हलवाई गणपतीही होणार ग्लोबल

दगडूशेठ हलवाई गणपती हा ग्लोबल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पत्र मंडळाला मिळाल आहे. त्यानुसार रोज 15 ते 20 परदेशी नागरिक हे आपल्या गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी येणार असल्याची माहितीदेखील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी दिली.

गणपती बाप्पा मोरया..! पुण्यातील गणेश मंडळांना पाच वर्षांचा परवाना; दगडूशेठ हलवाई गणपतीही होणार ग्लोबल
महादेव कांबळे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 29, 2022 | 5:04 PM

पुणेः पुण्यातील अनेक गणेश मंडळांकडून (Pune Ganesh Mandal) गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाला पोलीस प्रशासनाकडून मिळणारा परवाना (License) हा एकदाच पाच वर्षांचा असावा अशी मागणी होत होती. आता पुण्यातील गणेश मंडळांची ही मागणी आता मान्य झाली असून पोलिसांकडून पाच वर्षांचा परवाना देण्यास सुरुवात झाली आहे. काल शहरात गणेश मंडळाची पोलीस प्रशासन आणि महापालिका (Police Administration and Municipalities) प्रशासनासोबत बैठक पार पडली असून यामध्ये अनेक नियम ठवरण्यात आली असल्याची माहिती गणेश मंडळांकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गणेश मंडळाचे आता व्याप वाचणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून गणेश मंडळांना दरवर्षी नवा परवाना काढावा लागत होता. मात्र आता पाच वर्षाच्या या निर्णयामुळे गणेश मंडळाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती हा ग्लोबल

याबरोबरच दगडूशेठ हलवाई गणपती हा ग्लोबल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पत्र मंडळाला मिळाल आहे. त्यानुसार रोज 15 ते 20 परदेशी नागरिक हे आपल्या गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी येणार असल्याची माहितीदेखील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी दिली.

पुणे मेट्रो पुलामुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा

याबरोबरच पुणे मेट्रोच्या पुलामुळे विसर्जन मिरवणुकीला जो अडथळा निर्माण होणार होता, त्याबद्दलही चर्चा झाली असल्याची माहिती सुर्यंवशी यांनी दिली आहे.

पर्यटनाला चालना

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील अनेक गणेश मंडळांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाला पोलीस प्रशासनाकडून मिळणारा परवाना हा एकदाच पाच वर्षांचा असावा अशी मागणी होत होती त्यामुळे आता हा परवाना देण्यात येणार असल्याने गणेश मंडळाकडून परवाना काढण्यासाठी तयारी केली जात आहे. त्याबरोबरच दगडूशेठ हलवाई गणपती होणार आता ग्लोबल होणार असल्याने त्याचा फायदा आणि पुण्याच्या पर्यटनालाही यामुळे चालना मिळणाल असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें