AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganpati Visarjan | पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली, मिरवणुकीस लागले किती तास

Pune Ganpati Visarjan | पुणे गणेश विसर्जन मिरवणूक यंदा लवकर संपणार अशी अपेक्षा होती. परंतु यंदा विसर्जन मिरवणूक दीर्घ कालावधीपर्यंत चालली. आता प्रशासनाने दुपारी तीन वाजता मिरवणूक संपली असल्याचे जाहीर केले. यंदा दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाचे विसर्जन लवकर झाले.

Pune Ganpati Visarjan | पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली, मिरवणुकीस लागले किती तास
गणेश विसर्जनImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 29, 2023 | 3:51 PM
Share

पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशांचे पथकाबरोबर भव्य दिव्य देखावे भाविकांना पाहण्यास मिळाले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीतून दिसेल. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावर अलोट गर्दी झाली होती. परंतु यंदाही विसर्जन मिरवणूक चांगलीच लांबली. यंदा 2905 गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.

आधी मानाच्या गणपतीचे विसर्जन

पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुरु झाली होती. पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून मिरवणूक नेली. मिरवणुकीत ढोल, ताशे, लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. गुरुवारी सर्वात आधी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि मानचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले.

दगडूशेठ गणपतीचा विक्रम

पुणे शहरात मानाचे असलेल्या पाचही गणपतीनंतर सर्वाचे लक्ष दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जनाकडे लागले होते. यंदा प्रथमच मंडळ दुपारी चार वाजताच मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. मंडळाने यंदा फक्त पाच तासांत गणरायाचे विसर्जन केले. मंडळाने महिन्याभरापूर्वीच वेळेत विसर्जन करण्यासाठी दुपारी मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.

28 पेक्षा जास्त तास चालली मिरवणूक

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 28 तास 40 मिनिटे चालली. सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. दुपारी 3:10 वाजता मिरवणूक संपली.

कधी किती तास चालली मिरवणूक

  • 2016 मध्ये 28 तास 30 मिनिट विसर्जन मिरवणूक चालली होती.
  • 2017 मध्ये 28 तास 05 मिनिट विसर्जन मिरवणूक चालली होती.
  • 2018 मध्ये 27 तास 15 मिनिट विसर्जन मिरवणूक चालली होती.
  • 2019 मध्ये 24 तास विसर्जन मिरवणूक चालली होती.
  • 2020 आणि 2021 मध्ये कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
  • 2022 मध्ये 31 तास विसर्जन मिरवणूक चालली होती.
  • 2023 मध्ये 28 तास 40 मिनिटे ही मिरवणूक चालली.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....