AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganpati Visarjan | पुणे गणेश विसर्जन मिरवणूक २१ तासांपासून सुरुच, ‘दगडूशेठ’ गणपतीची किती वाजता झाले विसर्जन

Pune Ganpati Visarjan | पुणे गणेश विसर्जन मिरवणूक २० तासांपासून सुरुच आहे. पुणे येथील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन पूर्ण झाले आहे. दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाचे विसर्जन झाले आहे.

Pune Ganpati Visarjan | पुणे गणेश विसर्जन मिरवणूक २१ तासांपासून सुरुच, 'दगडूशेठ' गणपतीची किती वाजता झाले विसर्जन
दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूकImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 29, 2023 | 7:52 AM
Share

पुणे | 29 सप्टेंबर 2023 : गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक गणरायाचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत भव्य दिव्य देखावे पाहण्यास मिळाले. भाविकांनी हे देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. पुणे शहरात महत्व असलेल्या मानाचे पाचही गणपतीची विसर्जन झाले. त्यानंतर पुणेकरांचे नव्हे तर देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेत्यांप्रमाणे सेलिब्रेटीज मंडळींनीही हजेरी लावली होती.

विसर्जन मिरवणुकीत कोयता गँगचा देखावा

पुणे शहरात कोयता गँगचा बिमोड पुणे पोलिसांनी कसा केला, यावर विसर्जन मिरवणुकीत देखावा करण्यात आला होता. पुण्यातील कोयता गँगची चर्चा राज्यभर झाली होती. पुणे पोलिसांनी या कोयता गँगवर धडक कारवाई करत अनेकांना अटक केली. काही जणांवर मकोका लावला. ही सर्व दृश्य विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यातून साकारण्यात आली होती.

पुन्हा सकाळी सहा वाजता डीजेचा दणदणाट

पुण्यातील विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10 वाजता सुरु झाली होती. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक गेल्या 21 तासांपासून सुरु आहे. रात्री 12 वाजेनंतर थांबलेला डीजेचे दणदणाट सकाळी 6 वाजताच पुन्हा सुरु झाला आणि पुण्यातील तरुणाईने ठेका धरला. शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून अद्याप ही गणपती मंडळांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. अखिल मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी अलका टॉकीज चौकात दाखल झाली.

दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक दुपारी 4 वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर आली. यंदा विसर्जन मिरवणुकीत दुपारी 4 वाजता सहभागी होण्याची घोषणा मंडळाने यापूर्वीच केली होती. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणूक श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.