AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | गणेश विसर्जन मिरवणुकीत पाय ठेवण्यास जागा नव्हती, पण रुग्णवाहिका येताच वाट मोकळी

Pune 108 ambulance News | पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु होती. रस्त्यावर जनसागर लोटला होता. पाय ठेवण्यास जागा नव्हती. त्यावेळी रुग्णवाहिकेचा सायरन वाजला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजगता दाखवत आधी वाट मोकळी करुन दिली.

Pune News | गणेश विसर्जन मिरवणुकीत पाय ठेवण्यास जागा नव्हती, पण रुग्णवाहिका येताच वाट मोकळी
| Updated on: Sep 30, 2023 | 9:18 AM
Share

पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्सव सुरु होता. गणपती बाप्पा मोरया…असा जयघोष सुरु होता. रात्री ८.३० वाजता लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात गर्दीचा महासागर होता. पाय ठेवण्यास जागा नव्हती. त्यावेळी रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज आला. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सजगतेमध्ये बदलला. लागलीच रुग्णवाहिकेला जागा करुन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी हालचाल सुरु केली अन् गर्दीने ओसांडून वाहणाऱ्या रस्त्यावर रुग्णावाहिकेला जागा झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सजगतेमुळे रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचला.

आधी कार्यकर्ते नंतर पोलिसांनी घेतली सूत्र

गणपती चौकाकडून बेलबाग चौकाकडे रुग्णावाहिका येत असल्याचे होनाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिसली. कार्यकर्त्यांनी गर्दी बाजूला करत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन दिली. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बेलबाग चौकात वाट दिली जात असताना पुढे पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मोकळा केला. त्यामुळे वेळेवर रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. पोलीस, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे अलोट गर्दीच्या ठिकाणी हे शक्य झाले.

रुग्णवाहिकेत होती २१ वर्षीय तरुणी

मंगळवार पेठेत राहणारी २१ वर्षीय तरुणी रुग्णवाहिकेत होती. तिच्या शरीरातील साखर कमी झाल्यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे झाले. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र आपत्कालीन सेवा विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी रुग्णावाहिकेला जागा करुन दिली. तरुणीला वेळेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावर एका २७ वर्षीय तरुणीला तीव्र वेदना होता होत्या. तिला हालचाल करत येत नव्हती. १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी तिला सेवा दिली. तिच्या हाडांचे फॅक्चर झाले होते.

१०८ रुग्णवाहिकेची कामगिरी

विसर्जन मिरवणुकीत १०८ रुग्णवाहिकेने मोठी कामगिरी बजावली. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ३९५ जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये तीन जणांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मिरवणुकीसाठी २३ रुग्णवाहिका ठिकठिकाणी तैनात ठेवल्या होत्या. मिरवणुकीत छातीत दुखणे, चक्कर येणे, किरकोळ दुखापती असे रुग्ण आढळले, अशी माहिती विभागीय अधिकारी विठ्ठल बोडखे यांनी दिली.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.