AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | लग्नासाठी हुंडा मागितला, तिने हुंड्याला नकार देत चक्क Mount Everest गाठले

Pune News | देशात हुंडा विरोधात कायदा तयार केला गेला आहे. परंतु हुंडा प्रथा अजूनही पूर्णपणे नष्ट होऊ शकली नाही. आजही अनेक युवतींचे लग्न हुंड्यामुळे तुटतात. पुणे शहरातील युवतीने हुंड्याविरोधात चांगलाच आवाज उचलला आहे.

Pune News | लग्नासाठी हुंडा मागितला, तिने हुंड्याला नकार देत चक्क Mount Everest गाठले
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 16, 2023 | 1:54 PM
Share

पुणे | 16 सप्टेंबर 2023 : हुंडा घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. परंतु अजूनही सर्रास अनेक ठिकाणी हुंडा घेतला जातो. हुंडा प्रथा अजूनही पूर्ण नष्ट होऊ शकली नाही. हुंड्यासाठी अनेक महिलांच्या मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुणे शहरातील स्मिता घुगे या गिर्यारोहकला हुंडा प्रथेला समोरे जावे लागले. स्मिताच्या वडिलांकडे हुंड्याची मागणी झाली. तिने हुंडा देण्यास स्पष्ट विरोध केला. तिने मग या प्रथेचा विरोध आपल्या पद्धतीने केला. त्यासाठी तिने चक्क माऊंट एव्हरेस्ट गाठले. एका मुलाखतीत स्मिताने हा सर्व प्रकार सांगितला.

हुंडा मागितला अन् स्मिताने ठरवले

घरात स्मिताच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. तिच्यासाठी एक स्थळी आले. दोन्ही परिवार एकमेकांना भेटले. त्यानंतर स्मिताच्या घरी मुलाच्या परिवारातून फोन आला. त्यांनी सांगितले की, माझ्या भावाने हुंड्यात २० लाख रुपये घेतले. तुम्ही २० नाही तर १८ लाख हुंडा द्यावा. स्मिताने त्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी बैठक करुन कमीजास्त करण्याची तयारी दर्शवली. परंतु स्मिताने हुंडा म्हणून आपण एक रुपया देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

स्मिताने घेतला असा निर्णय

मुलाखतीत स्मिता म्हणते, लग्नसाठी मला अनेक स्थळे येत होती. परंतु सर्वांकडून हुंडा मागितला जात होतो. नाहीतर उंची लहान आहे, असे कारण सांगितले जात होते. मग तिने पदवीत्तर पदवी घेतली. त्यानंतर रिजेक्शन मिळत होते. मग आपल्यातील कमकरता दूर करण्याचा निर्णय तिने घेतला. याविरोधात सात महाद्विपामधील सर्वात उंच पर्वातावर अभियान करण्याचा निर्णय तिने घेतला. तिने गिर्यारोहण सुरु केले.

रशिया, आफ्रिकेतील पर्वातावर चढाई

स्मिताने रशिया, आफ्रिकेतील उंच पर्वतावर चढाई केली. आपल्या लग्नासाठी ठेवलेले दागिने विकून गिर्यारोहण पूर्ण केले. अगदी उणे २५ ते उणे ३५ डिग्री तापमानात चढाई केली. माऊंट एव्हरेस्ट गाठले. आपल्या मोहिमेनंतर एका सार्वजिनक कार्यक्रमात स्मिता सहभागी झाली. त्याठिकाणी इतर मुलीही तिल्या भेटल्या. त्यांनी आपली अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.