Pune Gold Rate | पुण्यात सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, आज काय आहे सोन्याचा दर?

| Updated on: Aug 23, 2021 | 11:35 AM

गेले दोन आठवडे रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दराने मागच्या तीन दिवसांत ब्रेक लावला आहे. मागच्या तीन दिवसांत पुण्यात सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण पहायला मिळत आहे. आज बाजारपेठ सुरू झाली तेव्हाही सोन्याची झळाळी काहीशी कमी झाल्याची जाणवत आहे.

Pune Gold Rate | पुण्यात सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, आज काय आहे सोन्याचा दर?
Gold-Price
Follow us on

पुणे : गेले दोन आठवडे रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दराने मागच्या तीन दिवसांत ब्रेक लावला आहे. मागच्या तीन दिवसांत पुण्यात सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण पहायला मिळत आहे. आज बाजारपेठ सुरू झाली तेव्हाही सोन्याची झळाळी काहीशी कमी झाल्याची जाणवत आहे. आज (23 ऑगस्टला) 10 रुपयांनी कमी होत सोन्याची बाजारपेठ सुरू झाली आहे. पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,680 रुपये प्रतितोळा आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,480 रुपये प्रतितोळा आहे. (steady decline in gold prices In the last three days in Pune)

तीन दिवसांत सतत घसरला सोन्याचा दर

20 ऑगस्टला सोन्याच्या दराने 190 रूपयांची वाढ नोंदवली होती. मात्र, त्यानंतरच्या तीन दिवसांत सोन्याचा दर सातत्यानं घसरत आहे. 21 ऑगस्टला सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण होऊन तो 48,700 रुपये प्रतितोळ्यावर आला. त्यानंतर 22 आणि 23 ऑगस्टला प्रत्येकी 10 रुपयांनी सोन्याचा दर पडला आहे.

चांदीची झाली ‘चांदी’

मागचा पूर्ण आठवडा मंदीचा सामना करणाऱ्या चांदीची या आठवड्याच्या सुरूवातीलाच ‘चांदी’ झाली आहे. सोमवारी चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. अनेक दिवसांनंतर चांदीचा दर वाढला आहे. आज पुण्यात चांदीचा दर प्रतिकिलो 62 हजार आहे. काल हा दर 61,700 होता. 17 ऑगस्टला एक दिवस चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली होती. एका दिवसांत चांदीचा दर 900 रुपयांनी वाढला होता. त्यावेळी एक किलो चांदीचा दर 63,600 रुपयांवर गेला होता.

सोने 50,000 रुपयांपर्यंत जाणार

तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. गुंतवणूकदार YOLO मेटलमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने आधीच सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवली असेल, तर आता ती धारण करणे फायदेशीर ठरू शकते.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.

इतर बातम्या :

Gold Hallmarking: हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधात आज सराफ व्यावसायिकांचा राज्यव्यापी बंद

Gold/Silver Price Today: मजबूत डॉलरमुळे सोन्यावर दबाव, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर

बँक खात्यातून 177 रुपये कापले जातायत? जाणून घ्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे का वसूल करतात?