AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold/Silver Price Today: मजबूत डॉलरमुळे सोन्यावर दबाव, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर

सोन्याच्या किमती 4 महिन्यांच्या नीचांकावर 4,600 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरल्यानंतर त्यात सुधारणा झाली, परंतु मौल्यवान धातू अजूनही गेल्या वर्षीच्या 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी उच्चांकापासून 9,000 रुपयांनी स्वस्त आहे.

Gold/Silver Price Today: मजबूत डॉलरमुळे सोन्यावर दबाव, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 10:28 AM
Share

नवी दिल्लीः Gold/Silver Price Today: सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच व्यापाराच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याचा भाव 01.2 टक्के प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह व्यापार करत आहे. तर सप्टेंबर वायदा चांदी 0.40 टक्के प्रतिकिलोने वाढली. मागील ट्रेडिंग सत्रात सोने सपाट बंद झाले होते, तर चांदी 0.7 टक्क्यांनी घसरली होती. सोन्याच्या किमती 4 महिन्यांच्या नीचांकावर 4,600 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरल्यानंतर त्यात सुधारणा झाली, परंतु मौल्यवान धातू अजूनही गेल्या वर्षीच्या 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी उच्चांकापासून 9,000 रुपयांनी स्वस्त आहे.

सोने आणि चांदीची नवी किंमत (Gold/Silver Price on 23 August 2021)

डॉलरच्या मजबुतीदरम्यान या मौल्यवान धातूचा व्यापार सलग चौथ्या दिवशी अत्यंत मर्यादित श्रेणीत आहे. MCX वर ऑक्टोबर वायदा सोन्याचे भाव 58 रुपयांनी वाढून 47,216 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर सप्टेंबर फ्युचर्स चांदीचा भाव 230 रुपयांनी वाढून 61,951 रुपये प्रति किलो झाला.

इतर चलनांच्या धारकांसाठी मौल्यवान धातूच्या आकर्षणावर परिणाम

जागतिक बाजारपेठेत सोन्यात किंचित घट झाली, कारण मजबूत डॉलरने इतर चलनांच्या धारकांसाठी मौल्यवान धातूच्या आकर्षणावर परिणाम केला. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,779.12 डॉलर प्रति औंस झाले, तर डॉलर निर्देशांक 93.33 च्या साडेनऊ महिन्यांच्या उच्चांकावर व्यवहार करीत होता. डेल्टा कोरोना व्हायरस साथीच्या प्रसारामुळे आर्थिक घसरणीच्या वाढत्या चिंतेत सोन्याचे नुकसान मर्यादित होते. चांदीचे भाव 0.2 टक्क्यांनी वाढून 23.05 डॉलर प्रति औंस झाले.

सोन्यात येऊ शकते घसरण

सोन्याच्या गुंतवणूकदारांना यूबीएस ग्रुपने इशारा दिलाय. ते म्हणतात की, कोरोनानंतर आर्थिक सुधारणेला गती मिळत आहे. यूएस जॉब मार्केट डेटा अपेक्षेपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व्ह वेळापूर्वी व्याज वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. यूबीएस समूहाच्या कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही रणनीतिक स्थितीत असाल तर या गुंतवणुकीतून बाहेर पडा. जर तुम्ही रणनीतिकदृष्ट्या गुंतवणूक केली असेल तर हेजिंग करा. यूबीएस समूहाचा अंदाज आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $ 1600 आणि चांदी $ 22 च्या पातळीवर येऊ शकते. याउलट गोल्डमन सॅक्स म्हणतो की, सोने पुन्हा $ 2000 च्या पातळीवर पोहोचेल.

संबंधित बातम्या

Income Tax : हे 5 मोठे नियम बदलले, आता उत्पन्नावर पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागणार

BIS ने Gold Hallmarking बाबत संभ्रम केला दूर, महासंचालकांनी दिली कामाची माहिती

Gold/Silver Price Today: Pressure on gold due to strong dollar, check the new price of 10 grams of gold

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.