Father rapes daughter : स्वत:च्या मुलीवर वारंवार बलात्कार; नराधम बापास पुण्यातल्या हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बलात्कार पीडितेने एफआयआरमध्ये म्हटले आहे, की जेव्हा तिची आई घरी नसे, त्यावेळी तिचे वडील तिच्यावर बलात्कार करत असत. छळाला कंटाळून मुलीने भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यातील इतर आरोपांसह बलात्कार आणि लैंगिक छळ संबंधित तक्रार नोंदवली.

Father rapes daughter : स्वत:च्या मुलीवर वारंवार बलात्कार; नराधम बापास पुण्यातल्या हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

May 27, 2022 | 2:48 PM

पुणे : स्वत:च्या मुलीवर वारंवार बलात्कार (Father rapes daughter) करणाऱ्या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या हडपसर येथे पोलिसांनी (Hadapsar police) ही कारवाई केली आहे. 18 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत आपल्या 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बुधवारी एका व्यक्तीला (वय 68) अटक करण्यात आली आहे. घरी कोणीही नसताना विशेषत: पत्नी नसताना तो आपल्या मुलीवर अत्याचार करीत असे. तसेच कोणालाही न सांगण्याची धमकीही तो देत असे. मात्र मुलीने नराधम बापाचे कारनामे उघड केले आहेत. आईला याविषयी सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास करत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या नराधम बापाला बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत. पुण्यातील हडपसर याठिकाणी हा प्रकार घडला.

पत्नीलाही आरोपीने केली मारहाण

हडपसर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी याप्रकरणी सांगितले, की संबंधित नराधम बाप आपल्या मुलीवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करीत होता. याविषयी कोणाकडेही वाच्यता करायची नाही, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. मात्र मुलीने हिंमत दाखवली आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने याविषयी पतीकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यात वादही झाला. एवढेच नाही, तर त्याने पत्नीला मारहाणही केली. नुकतेच ते त्यांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न ठरविण्यासाठी गेले होते.

पीडितेने नोंदवली बलात्कार आणि लैंगिक छळ संबंधित तक्रार

सोनटक्के पुढे म्हणाले, की बलात्कार पीडितेने एफआयआरमध्ये म्हटले आहे, की जेव्हा तिची आई घरी नसे, त्यावेळी तिचे वडील तिच्यावर बलात्कार करत असत. छळाला कंटाळून मुलीने भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यातील इतर आरोपांसह बलात्कार आणि लैंगिक छळ संबंधित तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच संशयिताला अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें