पुणे पुन्हा हादरलं! हिट अँण्ड रनची धक्कदायक घटना, 7 वर्षांचा चिमुकला…पोलिसांपुढे आव्हान!

Pune Hit And Run: बुधवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अपघातात 7 वर्षांच्या मुलीचे निधन झाले आहे. त्यानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पुणे पुन्हा हादरलं! हिट अँण्ड रनची धक्कदायक घटना, 7 वर्षांचा चिमुकला...पोलिसांपुढे आव्हान!
प्रतिकात्मक फोटो
Image Credit source: Freepik
Updated on: Nov 20, 2025 | 4:24 PM

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत हिट अँड रनच्या घटना घडत आहेत. आता बालेवाडीतही असेच काहीसे झाले आहे. एका टेम्पो चालकने दिलेल्या धडकेत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच मुलासोबत असलेल्या आजोबांवर उपचार सुरु आहेत. तसेच मृत्यू झालेल्या मुलाचा पाच वर्षीय भाऊ देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस फरार अरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

टेम्पो चालक फरार

पुण्याच्या बालेवाडीत हिट ऍण्ड रनची घटना घडलीये. या अपघातात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाच वर्षीय भाऊ आणि आजोबा जखमी झालेत. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. अनुराग चांदमारे असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव होते. तर पाच वर्षीय भाऊ अभिनव चांदमारे आणि आजोबा बंडू वावळकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवारी घडलेल्या अपघात प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

यापूर्वीही हिट अँड रन

गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी परिसरात हिट अँड रनची प्रकरणे घडत आहेत. सोमवारी देखील असाच एक प्रकार समोर आला होता. दुपारी डम्पर आणि दुचाकीच्या झालेल्या धडकेत 20 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही मुलगी डम्परखाली आली होती. मृत मुलीचे नाव तन्वी सिद्धेश्वर साखरे असे होते. तसेच डम्पर चालक अजय अंकुश ढाकणे यांना अटक करण्यात आली. तसेच मृत मुलीचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

हिंजवडी येथील आयटी नगरीमध्ये सतत हिट अँड रनच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आता हिंजवडी पोलिसांना जाग आली आहे. पोलिसांकडून डंपर असेल किंवा रेडमी मिक्स वाहनांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या मालिकेला हिंजवडीतील रस्ते वाहतूक कोंडी की कोणते निर्बंध नसलेले जड वाहनाची वाहतूक जबाबादर आहे असा प्रश्न पडला आहे.