…आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतून पुणे भाजपातला ‘हा’ अतिशय अवघड विषय मार्गी लागला

पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasaba Peth) पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी, या विषयावरुन भाजपच्या (BJP) गोटात आठवड्याभरापासून खलबतं सुरु होती. या विषयाची समस्या देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संयमाने सोडवली.

...आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतून पुणे भाजपातला 'हा' अतिशय अवघड विषय मार्गी लागला
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 9:21 PM

पुणे : पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasaba Peth) पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी, या विषयावरुन भाजपच्या (BJP) गोटात आठवड्याभरापासून खलबतं सुरु होती. कसबा पेठच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकीसाठी इच्छुक होते. तर पिंपरी चिंचवड मतदारसंघातही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील दोन सदस्य इच्छुक होते. त्यामुळे पक्षापुढे पेच निर्माण झाला होता. उमेदवारीवरुन पक्षात बरीच चर्चा झाली. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीमुळे मार्ग निघाला.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी निवडणुकीचं तिकीट आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला मिळावं, असं बोलून दाखवलं होतं. विशेष म्हणजे पक्षाने प्रदेश कार्यकारिणीला शैलेश टिळक आणि त्यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांची नाव पाठवल्याची माहिती समोर आली होती.

या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री शैलेश टिळक यांच्या घरी दाखल होत त्यांच्यासोबत बातचित केली. या बैठकीत फडणवीस यांना शैलेश टिळक यांची समजूत घालण्यात यश आलं.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे कुणाल टिळक यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आलंय. त्यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिलीय. तर कसबा पेठच्या पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील दोन सदस्य इच्छुक होते. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप इच्छुक होते. त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला द्यावी हा भाजपपुढे पेच होता.

अखेर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सौम्यपणे आणि संयमाने हा मुद्दा हातळत उमेदवाराची निवड केली. त्यांच्या मध्यस्थीमुळे पुणे भाजपातील धुसफूस उफाळून निघण्यापेक्षा शांतपणे मार्ग निघाला.

पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक तास शंकर जगताप माध्यमांसमोर आले नव्हते. अखेर रात्री साडेआठ वाजता ते माध्यमांसमोर आले.

शंकर जगताप यांची प्रतिक्रिया

“वहिनीची उमेदवारी आज जाहीर होणार आहे याची कल्पना नव्हती. अन्यथा मी घरी थांबलो असतो. गिरीश महाजन घरी येणार आहेत हे देखील माहीत नव्हतं”, असं शंकर जगताप यांनी सांगितलं.

“कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी दिली तरी आम्ही पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. पक्षाचे आभार मानतो कारण आमदार भाऊंच्या जागी वहिनींना आता संधी दिली आहे”, असं शंकर जगताप म्हणाले.

“जगताप कुटुंबात उमेदवारीवरून वाद नव्हता. मी 2007 ते 2012 नगरसेवक होतो. भाऊंनी निवडणूक लढवण्यास थांबवलं तेव्हा मी थांबलो, हे सर्वांना माहित आहे. राजकारणावरून आमच्या कुटुंबात वाद नव्हता, होणार ही नाही आणि उद्याही नसणार”, असं शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं.

“माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे. मी रणनीती आखलेली आहे. त्याप्रमाणे प्रचार सुरू केला आहे”, अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी दिली.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.