AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको परत पाहिजे म्हणून जावई थेट कब्रस्तानात पोहोचला, मध्यरात्री त्याने जे केलं, ते पाहून अंगावर काटा येईल!

पुण्याच्या कोंढवा भागातील कौसरबाग कबरस्तानात सासरच्या मंडळींवर काळी जादू करणाऱ्या जावयाला नागरिकांनी रंगेहात पकडले. पत्नी परत यावी म्हणून फोटोंना सुया टोचून अघोरी विधी करणाऱ्या आरोपीविरुद्ध कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बायको परत पाहिजे म्हणून जावई थेट कब्रस्तानात पोहोचला, मध्यरात्री त्याने जे केलं, ते पाहून अंगावर काटा येईल!
black magic
| Updated on: May 26, 2026 | 11:49 AM
Share

पुण्यातील कोंढवा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने पुन्हा सोबत राहावे आणि सासरच्या मंडळींनी पैसे द्यावेत, या हेतूने एका जावयाने चक्क मध्यरात्री कब्रस्तानात जाऊन सासरच्यांवर काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. कौसरबाग कबरस्तान परिसरात १९ मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली. आता हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मध्यरात्री कबरस्तानात काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परवेज अब्दुल अजीज मेमन (रा. हिल मिस्ट गार्डन, कौसरबाग) याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होते. या वादातून त्याची पत्नी सध्या त्याच्यासोबत न राहता आपल्या माहेरी राहत आहे. पत्नीने परत यावे आणि मेहुण्याने आपल्याला पैसे द्यावेत, या अविचाराने परवेजने अघोरी मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले.

१९ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास, परवेज कौसरबाग येथील कबरस्तानात गेला. तेथे तो सासरच्या मंडळींच्या फोटोंना सुया टोचून काहीतरी अघोरी विधी करत होता. कबरस्तान परिसरात मध्यरात्री सुरू असलेल्या या संशयास्पद हालचाली स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडल्या. नागरिकांनी धाडस करून जवळ जाऊन पाहिले असता, परवेजचे अघोरी कृत्य समोर आले. तो त्याचे सासरे, सासू, मेहुणा आणि मेहुण्याची पत्नी यांच्या फोटोंवर सुया टोचून काळी जादू करत होता.

नागरिकांनी पकडले, पोलिसांत गुन्हा दाखल

हा प्रकार पाहताच संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आरोपी परवेजला जागीच पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरुवातीला प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. मात्र, दोन दिवसांनंतर जेव्हा ही माहिती त्याचा मेहुणार हसनेन रफिक जाफरानी (४०) यांना समजली, तेव्हा त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

यानंतर हसनेन जाफरानी यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी आरोपी परवेज अब्दुल अजीज मेमन याच्याविरोधात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सासरच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी आणि कौटुंबिक वादातून हा प्रकार केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुंभार करत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा