AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पोलिसांचा फोन खणखणला अन् अवघ्या पाच मिनिटांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Pune Crime News | सोने-चांदीची दुकाने दरोडेखारांचे नेहमी लक्ष ठरलेली असतात. पुणे जिल्ह्यातील सोने चांदीच्या दुकानावर दरोडेखोरांनी बुधवारी पहाटे दरोडा टाकला. सात जणांनी मिळून हा धाडसी दरोडा टाकत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु पाच मिनिटांत पोलीस पोहचले आणि दरोडेखोरांना...

Video | पोलिसांचा फोन खणखणला अन् अवघ्या पाच मिनिटांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
robbery
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 08, 2023 | 1:57 PM
Share

सुनिल थिगळे, पुणे | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारात गजबजलेला आहे. दिवाळीत सोने-चांदीची खरेदी करण्याची प्रथा आहे. यामुळे सोने-चांदीचे दुकानदार आपल्या दुकानात पुरेसा साठा ठेवत आहे. सर्व ज्वेलर्स दिवाळीच्या तयारीला लागले असताना पुणे जिल्ह्यात वेगळीच घटना घडली. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील उत्तमभाग्य ज्वेलर्सवर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. सात जणांनी मिळून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला. सोने चांदीचे दागिने आपल्या बॅगांमध्ये भरू लागले. परंतु अवघ्या पाच मिनिटांत पोलीस आले.

काय घडला घटना

मंचर येथील उत्तमभाग्य ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटे तीन वाजता सात जण घुसले. काही हत्यारांचा वापर करत त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश केला. या घटनेची कुणकुण शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागली. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन आल्यानंतर पाच मिनिटात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोने, चांदीचे दागिने बॅगेत भरत असताना पाच जणांना पकडले. यावेळी दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

robbery

मुद्देमालही जप्त

पोलिसांनी घटनास्थळी पाच जणांना अटक केली. त्या दरोडेखोरांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत चोरट्यांकडून कोयते, गॅस कटर व इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेते दोघे जण पळून गेले. त्यांच्या शोधासाठी टीम रवाना झाली आहे. त्यांच्याकडे काय मुद्देमाल आहे का? हे त्यांना पकडल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या टोळीतील दरोडेखोर अट्टल आहे. त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याची शक्यता उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केली. आरोपींच्या चौकशीतून आणखी माहिती उघड होणार आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये वैभव बाळू रोकडे, गणेश रामचंद्र टोके, अजय सखाराम भिसे, ग्यानसिंग भोला वर्मा, मोहम्मद अरमान दर्जी यांचा समावेश आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!