AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune-Moshi tragedy : मंत्री अडकला तर चारशे जेसीबी लावले असते.. नातेवाईकांचा बांध सुटला, आतापर्यंत सात मृतदेह…

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात आणखी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात NDRF ला यश आले आहे. आतापर्यंत सहा कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या ढीगाऱ्यातूम आज दिवस भरात रेस्क्यू टीमने ६ मृतदेह बाहेर काढले आहेत.

Pune-Moshi tragedy : मंत्री अडकला तर चारशे जेसीबी लावले असते.. नातेवाईकांचा बांध सुटला, आतापर्यंत सात मृतदेह...
| Updated on: Jul 12, 2026 | 11:19 AM
Share

पुण्यातील मोशी येथे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजल्याची इमारत धाराशाही होण्याची घटना ८ जुलै रोजी घडल्यानंतर या इमारतीच्या ढीगाऱ्यातून आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या कोलमडलेल्या इमारतीच्या आत शिरण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या दुर्घटनेत १४ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले गेले आहे. मात्र, सात जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून आणखी तिघे जण आत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या बचाव मोहिमेत उशीर होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, जर यात मंत्री संत्री अडकला असता तर ४०० जेसीबी लागले असते असा त्रागा नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

परवाची ही घटना अतिशय दुर्देवी आहे.अकस्मात ही घटना झाली. इतर घटनापेक्षा ही घटना वेगळी आहे. नातेवाईक संतप्त होते, पण मी त्यांना समजावले आहे. दोषींना कुठल्याही प्रकारे शासन पाठीशी घालणार नाही.या घटनेनंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. आताच मला काही नातेवाईकांनी सांगितले की एका मृतदेहाला दुसऱ्या बाजूने बाहेर काढले होते.हा विषय संवेदनशील आहे.जे काही मृतदेह बाहेर येतील ते त्यांच्या नातेवाईकांना दाखववेत असे आदेश दिले आहेत.

जखमींच्या नातेवाईंकाना पाच लाख देणार

कंपनी तर्फे मदत आणि महाराष्ट्र शासन आणि महापालिका आर्थिक मदत करत आहे. सरकार प्रत्येक जखमींच्या नातेवाईंकाना पाच लाख देणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटना स्थळाला भेट दिल्यानंतर म्हटले आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या विषयी सहवेदना आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात विषारी वायू आहे त्यामुळे अडचण येत आहे. अन्य काही जण अडकले आहेत त्यांचा शोध सुरू आहे.या घटनेबाबत चौकशी चालू असल्याचे देखील सूनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

दि. ०९ जुलै २०२६

मोशी कचरा डेपो दुर्घटना पहिला मृतदेह बाहेर काढला :  शोध मोहिमेमध्ये भावेश वाणी याचा मृतदेह सापडला.

दि. ११ जुलै २०२६

वेळ : दुपारी २ . ३० वाजता

मोशी कचरा डेपो दुर्घटना दुसरा मृतदेह बाहेर काढला

शोध मोहिमेमध्ये अक्षय सावंत आढळून आले असून त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे

दि. ११ जुलै २०२६

वेळ : सायंकाळी ५.१० वाजता

मोशी कचरा डेपो दुर्घटना – तिसरा मृतदेह बाहेर काढला

शोध मोहिमेमध्ये सुनील कोरके (वय ४०, आळंदी) यांचा मृतदेह सापडला असून त्यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दि. ११ जुलै २०२६

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोशी कचरा डेपो दुर्घटना चौथा मृतदेह बाहेर काढला

शोध मोहिमेमध्ये सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी) यांचा मृतदेह सापडला असून त्यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दि. ११ जुलै २०२६

वेळ : सायंकाळी ६.१० वाजता

मोशी कचरा डेपो दुर्घटना पाचवा मृतदेह बाहेर काढला

शोध मोहिमेमध्ये महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर) यांचा मृतदेह सापडला असून त्यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दि. ११ जुलै २०२६

वेळ : सायंकाळी ६.२० वाजता

मोशी कचरा डेपो दुर्घटना सहावा मृतदेह बाहेर काढला

शोध मोहिमेमध्ये नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी) यांचा मृतदेह सापडला असून त्यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दि. ११ जुलै २०२६

वेळ : सायंकाळी ७.१५ वाजता

मोशी कचरा डेपो दुर्घटना सातवा मृतदेह बाहेर काढला

शोध मोहिमेमध्ये रणजीत पाटील (वय २२, मोशी) यांचा मृतदेह सापडला असून त्यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ