पुण्यात घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरूवात, अंथरुणाला खिळलेल्यांना मिळणार कोरोना लस, असा करा अर्ज

पुणे महानगपालिकेकडून (Pune Municipal Corporation) अंथरुणाला खिळलेल्यांना घरोघरी जाऊन लसीकरण (door-to-door vaccination) मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. एका दिवसात कोथरुडमधल्या (Kothrud) 9 जणांना घरी जाऊन कोरोनाची लस देण्यात आली आहे.

पुण्यात घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरूवात, अंथरुणाला खिळलेल्यांना मिळणार कोरोना लस, असा करा अर्ज
पुणे लसीकरण

पुणे : पुणे महानगपालिकेकडून (Pune Municipal Corporation) अंथरुणाला खिळलेल्यांना घरोघरी जाऊन लसीकरण (door-to-door vaccination) मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंगळवारपासून ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. एका दिवसात कोथरुडमधल्या (Kothrud) 9 जणांना घरी जाऊन कोरोनाची लस देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation has started a door-to-door vaccination campaign for bedridden patient)

टप्प्याटप्प्याने केलं जाणार लसीकरण

आजारपणामुळे अनेक नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी महानगरपालिकेने विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. ज्यात अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन कोरोनाची लस दिली जात आहे. आतापर्यंत महानगरपालिकेकडे घरी लसीकरणासाठी 70 अर्ज आले आहेत. टप्प्याटप्प्याने या नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस घरी जाऊन देण्यात येणार आहेत. त्यासाठी नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पूर्तता करून जमा करण्याचं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

घरी लसीकरणासाठी कसा करणार अर्ज?

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी bedriddenvaccination.pune@gmail.com या ईमेलवर ऑनलाईन अर्ज करणाचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.

घरी लसीकरणासाठी कोणती कागदपत्र लागणार?

संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळल्याचे कारण, सदरची व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आणि त्याच्या नातेवाईकांचे संमतीपत्र ही कागदपत्रं लसीकरणासाठी आवश्यक आहेत.

कशी दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस?

कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी दिलेल्या पत्त्यावर तारीख आणि लसीकरणाची वेळ कळवली जाईल. लसीकरण करताना आणि लसीकरण झाल्यानंतर 30 मिनीटे व्यक्तीचे निरीक्षण करण्यासाठी फॅमिली डॉक्टर उपस्थित असणे अपेक्षित आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात उसळी, सक्रिय रुग्णसंख्याही पुन्हा वाढली

दुसरा डोस मिळणं कठीण, नाशिकमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यानं ज्येष्ठ नागरिकांवरही भटकंतीची वेळ

नागपूरकरांवर नवं संकट, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढणार? आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI