5

दुसरा डोस मिळणं कठीण, नाशिकमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यानं ज्येष्ठ नागरिकांवरही भटकंतीची वेळ

कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्यानं नागरिक लसीकरण केंद्रावर जात आहेत. मात्र, कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे प्रचंड गर्दी होऊन अनेकांना विनालस घरी परतावं लागतंय. इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलला रोज 300 ते 400 डोस लागत असताना केवळ 150 डोस मिळत आहेत.

दुसरा डोस मिळणं कठीण, नाशिकमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यानं ज्येष्ठ नागरिकांवरही भटकंतीची वेळ
customs duty corona vaccines
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 10:06 AM

नाशिक : कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्यानं नागरिक लसीकरण केंद्रावर जात आहेत. मात्र, कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे प्रचंड गर्दी होऊन अनेकांना विनालस घरी परतावं लागतंय. इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलला रोज 300 ते 400 डोस लागत असताना केवळ 150 डोस मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांना रांगेत उभं राहूनही शेवटी लसीकरण केंद्रातून रिकाम्या हातीच परत जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय.

कोरोना लसीकरणाच्या कूपनसाठी पहाटेपासून रांगा

विशेष म्हणजे काही नागरिकांनी पहिला डोस घेऊनही त्यांना दुसरा डोस मिळणे कठीण झाले आहे. दुसरा डोस घेणाऱ्या 45 व 60 वर्षांवरील नागरिकांना तर शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. लस घेतल्यानं कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, असे बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत अनुभवाला आले. त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रासमोर आता युवक-युवतीही गर्दी करत आहेत. कूपन घेण्यासाठीही पहाटेपासून रांगा लागत आहेत.

लस तुटवड्यामुळं नागरिकांना लसीकरणाशिवाय आल्या पावली मागे फिरण्याची वेळ

आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी 10 वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी रेल्वे हॉस्पिटलने कूपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढेच कूपन आधी वितरित केले जातात. नागरिक पहिल्यांदा कूपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जाते. त्यामुळे 150 लस उपलब्ध असताना 250 ते 300 नागरिक केवळ कूपनसाठी रांगेत लागतात. उरलेल्या नागरिकांना आल्या पावली मागे फिरावे लागते. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणाचे डोस वाढवून देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

मुंबईत कोरोनावर नियंत्रण कसे मिळवले?; राजेश टोपेंनी सांगितलं कारण; तृतीयपंथीय, एलजीबीटींसाठी विशेष लसीकरण केंद्राचे लोकार्पण

Pune Corona Update | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या खाली, 233 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड, एकाच दिवसात 11 लाख नागरिकांना लस

व्हिडीओ पाहा :

Corona vaccine shortage in Igatpuri Nashik senior citizens also face issue

Non Stop LIVE Update
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?