AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune dilapidated wadas : पुण्यात 245 वाडे जीर्ण अन् राहण्यास धोकादायक! महापालिकेनं बजावली नोटीस

महापालिकेने मालकांना नोटिसा बजावल्यानंतर जुने, मोडकळीस आलेले आणि अनधिकृत वाडे पाडण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात केलेल्या वार्षिक सर्वेक्षणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

Pune dilapidated wadas : पुण्यात 245 वाडे जीर्ण अन् राहण्यास धोकादायक! महापालिकेनं बजावली नोटीस
पुण्यातील जीर्ण वाडे (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: HT file photo
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 29, 2022 | 2:04 PM
Share

पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) पावसाळ्यापूर्वी 245 जीर्ण वाड्यांतील रहिवाशांना नोटीस बजावली आहे. हे वाडे अस्थिर आणि राहण्यासाठी धोकादायक असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे. याठिकाणाहून तत्काळ स्थलांतरित न झाल्यास कोणतीही अनुचित घटना घडू शकते. धोकादायक (Dangerous) असलेले 14 जीर्ण वाडे पाडण्यात आले आहेत. तर आम्ही वाड्यांच्या मालकांवर आणि रहिवाशांवर लक्ष ठेवून आहोत, ज्यांना आम्ही बांधकाम पाडण्याची माहिती दिली आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील (Building permission department)अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिकेने या वाड्यांची C1, C2 आणि C3 या तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. ज्या वास्तूंची नासधूस करायची आहे ती C1 श्रेणीत मोडतात तर C2 संरचनांना दुरुस्तीची गरज असते आणि C3 संरचनांसाठी किरकोळ कामे आवश्यक असतात. महापालिका दरवर्षी जुन्या वाड्यांचे सर्वेक्षण करते.

भाडेकरू आणि मालक यांच्यातील वाद

नागरी अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने मालकांना नोटिसा बजावल्यानंतर जुने, मोडकळीस आलेले आणि अनधिकृत वाडे पाडण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात केलेल्या वार्षिक सर्वेक्षणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सोमवार पेठ, कसबा पेठ, घोरपडे पेठ, मंगळवार पेठ आणि आजूबाजूच्या भागात असलेल्या बहुतेक बांधकामे प्रामुख्याने पेठ भागात पाडण्यात आली आहेत. पीएमसी या वाड्यांच्या घसरलेल्या भागांमुळे अपघात झाल्याची नोंद करते. अशा अपघातांमुळे अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे. अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. भाडेकरू आणि मालक यांच्यातील वादामुळे अनेक वर्षांपासून या मालमत्तांचा पुनर्विकास रखडला आहे.

इमारतीवरील हक्क संपुष्टात येण्याची वाटते भीती

कायदेशीर नोटीस बजावल्यानंतरही काही रहिवासी घरावरील ताबा सोडण्यास तयार नसतात. या जुन्या, मोडकळीस आलेल्या वास्तूंमधील रहिवाशांना अनेकदा भीती वाटते, की एकदा बिल्डरने संरचनेचा पुनर्विकास केला की त्यांचा इमारतीवरील हक्क संपुष्टात येईल. अनेक पुनर्विकास किंवा दुरुस्तीचे प्रकल्प कायदेशीर लढाईमुळे ठप्प झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी महापालिकेने पोलिसांची मदत घेतली होती. वर्षानुवर्षे कमकुवत झालेल्या वास्तू कोसळल्या असून त्यामुळे रहिवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना इजादेखील झाली आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल