Pune Ganeshotsav : गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेची नियमावली, कोरोना नियमांचं पालन बंधनकारक

| Updated on: Aug 10, 2022 | 12:38 PM

महापालिका, पोलीस प्रशासन तसेच शहरातील गणेशमंडळांची नुकतीच महापालिकेत बैठक पार पडली. महापालिकेने यावेळी गणेश मंडळांनी पाळावयाच्या नियम, अटी याविषयी माहिती दिली.

Pune Ganeshotsav : गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेची नियमावली, कोरोना नियमांचं पालन बंधनकारक
श्रीगणेश
Image Credit source: Dagdusheth Ganpati
Follow us on

पुणे : गणेशोत्सवासाठी (Pune Ganeshotsav) महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार नियमावलीनुसार, स्वागत कमानींची उंची 18 फुटांहून अधिक असावी, मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा अधिक नसावी, अधिकृत परवान्यांची प्रत मंडपात दर्शनी भागात लावावी, असे विविध नियम घालून देण्यात आले आहेत. यंदा निर्बंधमुक्त गणोशोत्सव साजरा होत आहे. मागील दोन वर्ष कोविडमुळे (Covid) कोणताही उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र कोविडची लाट ओसरली आहे. अद्याप कोविड संपला नसला तरी रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याची तयारी जोरदारपणे सुरू आहे. गणेश मंडळांसाठी पुणे पोलिसांनी त्यांची नियमावली आधीच जाहीर केली आहे. आता महापालिकेतर्फेदेखील (PMC) नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

‘जाहिरातींवर बंधने नकोत’

महापालिका, पोलीस प्रशासन तसेच शहरातील गणेशमंडळांची नुकतीच महापालिकेत बैठक पार पडली. महापालिकेने यावेळी गणेश मंडळांनी पाळावयाच्या नियम, अटी याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर मंडळांना मांडव, स्टेज, कमानी, रनिंग मंडपावर लावल्या जाणाऱ्या जाहिराती याविषयी नियम आणि अटी दिल्या आहेत. मात्र जाहिरात हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याचा दावा गणेश मंडळांनी केला आहे. त्यामुळे यंदा रनिंग मांडवावर बंधने नकोत, अशी मागणी मंडळांनी केली आहे. त्यासोबतच इतर काही मागण्यादेखील मंडळांनी केल्या आहेत.

परवानगी आवश्यक

जाहिरातीसंदर्भात महापालिकेने भूमिका स्पष्ट केली आहे. परवानगी घेतल्यानंतरच मंडळांना जाहिराती लावला येणार आहेत. रनिंग मंडपावर जाहिराती लावण्यासाठी महापालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाची अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे. वाहतूक पोलीस त्याचप्रमाणे पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपक्रासह मुख्य मांडवापासून दोन्ही बाजूला 50 मीटर अंतरापर्यंतच अधिकृत जाहिरात लावता येणार आहे. तर या अंतरात एकापेक्षा जास्त मंडळे असतील तर त्यांना जागा विभागून देण्यात येणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तर एक पंचमांश भागात महापालिकेच्या उपक्रमांची जाहिरात लावणे बंधनकारक असणार आहे.

हे सुद्धा वाचा

नियम आणि अटी

  1. स्वागत कमानींची उंची 18 फुटांहून अधिक असावी, मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा अधिक नसावी,
  2. अधिकृत परवान्यांची प्रत मंडपात दर्शनी भागात लावावी
  3. मंडळांना करोना प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यक राहील
  4. गणेशोत्सव संपल्यानंतर संबंधित मंडळाने तीन दिवसांच्या आत मांडव, देखाव्याचे बांधकाम, साहित्य हटवावे