AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जैसी करनी वैसी भरनी’, हत्या केल्यानंतर अशी शिक्षा आतापर्यंत कोणाला मिळाली नसेल

Pune Crime News : पुणे जिल्ह्यात एक आगळी वेगळी घटना घडली आहे. आरोपीने आपल्या भाऊ आणि वहिनीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात वहिनीचा मृत्यू झाला. तर भाऊ गंभीर जखमी आहे. परंतु यानंतर त्या आरोपीला अशी शिक्षा मिळाली की भविष्यात काहीच होणार नाही.

'जैसी करनी वैसी भरनी', हत्या केल्यानंतर अशी शिक्षा आतापर्यंत कोणाला मिळाली नसेल
| Updated on: Apr 26, 2023 | 2:05 PM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला चांगलीच शिक्षा मिळाली. हा व्यक्ती आपल्या भाऊ आणि वहिनीची हत्या करण्याचा प्रयत्न करुन पळून जात होता. परंतु त्याला काळानेच अशी शिक्षा दिली की भविष्यात काहीच होणार नाही. यामुळे ‘जैसी करनी वैसी भरनी’, चा प्रत्यय आला. सॉफ्टवेयर इंजिनिअर असलेल्या भाऊ आणि वाहिनीला यांना ठार करण्याचा प्रयत्न आरोपीने किरकोळ कारणांवरुन केला. पुणे जिल्ह्यातील आंबले गावात हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पुणे हादरले.

नेमके काय झाले

पुण्यातील सुनील बेंद्रे व प्रियंका बेंद्रे यांचे नवीन लग्न झाले. पुण्यात सुनीलचा चुलत भाऊ अनिल राहत होतो. परंतु तो वारंवार नोकरी सोडत होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला आपली शेती करण्याचा सल्ला दिला. त्यातून दोघांमध्ये वादही झाला होता. वडिलांना सुनीलनेच आपली नोकरी गेल्याचे सांगितले, असा समज अनिलचा झाला होता. त्यावरुन रविवारी वडिलांशी भांडण झाल्यानंतर त्याने एका रुममध्ये स्वत: ला कोंडून घेतले.

सुनील, प्रियंका आले गावी

सुनील बेंद्रे व प्रियंका बेंद्रे यांना लंडनमध्ये नोकरीचा संधी मिळाली. पण त्यापूर्वी अनिलशी सुरु असलेले भांडण मिटवण्यासाठी वडिलांनी दोघांना गावी बोलावले होते. यावेळी दोन्ही भावांमध्ये सविस्तर चर्चा झाली. सुनीलने त्याला व्यवस्थित समजावून सांगितले होते. यानंतर कुटुंब झोपले होते. मात्र सकाळ होताच आरडोओरडा सुरु झाला. अनिलने प्रियांका आणि सुनिलची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ सुनील बचावला होता. त्याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अनिलने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी अनिल दुचाकीवरून पळून जात असताना न्हावरे – चौफुला रस्त्यावर येणाऱ्या स्विफ्ट कारने त्याला धडक दिली. या धडकेत तोही गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुनीलची प्रकृती गंभीर

सध्या सुनिल यांचीही तब्येत गंभीर आहे. त्यांच्या छातीवर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.