AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News: दहीहंडीनंतर लोखंडी कमान काढताना मोठी दुर्घटना, पुण्यात महिलेचा मृत्यू, जुन्या सांगवीवर शोककळा

मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर शहरात दहिहंडीचा उत्साह साजरा होत आहे. तर काही ठिकाणी गोविंदाही मोठ्या संख्येने जखमी झालेले आहेत. त्यातच पुण्यातील जुन्या सांगवीतून एक बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव आहे. रात्री […]

Pune News: दहीहंडीनंतर लोखंडी कमान काढताना मोठी दुर्घटना, पुण्यात महिलेचा मृत्यू, जुन्या सांगवीवर शोककळा
पुणे दहीहंडी अपघातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 2:43 PM
Share

मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर शहरात दहिहंडीचा उत्साह साजरा होत आहे. तर काही ठिकाणी गोविंदाही मोठ्या संख्येने जखमी झालेले आहेत. त्यातच पुण्यातील जुन्या सांगवीतून एक बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव आहे.

रात्री घडली घटना, परिसरात हळहळ

रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, मृत महिलेचा मुलगा मंडळात असल्याने कुटुंबियांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली असून पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करू नये, अशीही विनंती करण्यात आली आहे. या घटनेनं जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं घडलं काय?

प्राप्त माहितीनुसार, जुन्या सांगवी परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी उत्साहात पार पडली. हा उत्सव झाल्यानंतर गर्दी पांगली. अनेक जणांनी घराचा मार्ग धरला. उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी सांगाडा काढण्याचे काम सुरू होतं. त्यावेळी सलमा पठाण या पतीसोबत घटनास्थळी उभ्या होत्या. लोखंडी सांगाडा काढण्याचे काम सुरू असतानाच अचानक लोखंडी बाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेने जुन्या सांगवी परिसरावर एकच शोककळा पसरली. मृत महिलेचा मुलगाही या दहीहंडी मंडळात असल्याचे समोर आले. मृत महिलेचा मुलगा मंडळात असल्याने कुटुंबियांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली असून पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करू नये, अशीही विनंती करण्यात आली आहे.

Follow Us
मोदींनी ज्यांना चोर म्हटलं, त्यांनाच भाजपने मुख्यमंत्री केलं!
Vijay Wadettiwar | मोदींनी ज्यांना चोर म्हटलं, त्यांनाच भाजपने मुख्यमंत्री केलं! विजय वड्डेटीवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...