AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Online Job | एक लाईक करा अन् 50 रुपये कमवाच्या चक्करमध्ये असा फसला की गमावले 1 कोटी

नेहमी ऑनलाईन असणारे सायबर चोरटे फसवणुकीसाठी ग्राहक शोधत असतात. नवीन नवीन शक्कल लढवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात. मग तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकताच तुमची आयुष्यभराची कमाई लंपास करतात. पुणे शहरात नुकताच असा प्रकार घडलाय.

Online Job | एक लाईक करा अन् 50 रुपये कमवाच्या चक्करमध्ये असा फसला की गमावले 1 कोटी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 31, 2023 | 3:47 PM
Share

पुणे : ऑनलाइन Fraud करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन असणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून तुम्हाला जाळ्यात ओढतात. मग तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकताच तुमची आयुष्यभराची कमाई लंपास करतात. पुणे शहरातील माजी सैनिकाची अशीच फसवणूक झाली आहे. या प्रकारात माजी सैनिकाच्या पाच बँकांमधील सुमारे एक कोटी रुपये गेले आहेत. त्यांची सर्व बचत, सेवानिवृत्ती लाभ आणि आणि मुलाकडून घेतलेले सर्व पैसे गेले आहेत. ही रक्कम 1 कोटी रुपये आहे.ऑनलाइन कामाच्या संधीतून ही फसवणूक झालीय. एक लाईक करा अन् 50 रुपये कमवाच्या या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे.

नेमके काय घडले

पोलिसांमध्ये दाखल तक्रारीनुसार, ऑनलाइन फसवणूक 13 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली होती, मात्र माजी सैनिकाने मागील आठवड्यात पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षी एक मेसेजिंग अ‍ॅप डाउनलोड केला होता, ज्यामुळे ग्रुप चॅटिंग करता येते. तिथे त्याला एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला, ज्यामध्ये त्याला सोप्या कामांसाठी खूप पैसे मिळत असल्यचा दावा केला गेला. हे काम म्हणजे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर लाईक बटणावर क्लिक करण्याचे होते. सुरुवातीला केलेल्या कामाचे त्यांना वेलकम बोनस म्हणून 1,000 मिळाले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना या कामांवर अधिक परतावा देण्यासाठी गुंतवणुकीची ऑफर दिली. त्यांनी पैसे जमा केले अन् आयुष्यभराची पुंजी गेली.

अशी गेली रक्कम

पोलिसांनी सांगितले की, माजी सैनिकाकडे 60 लाख रुपयांची बचत आणि सेवानिवृत्तीची रक्कम होती. तसेच त्यांने मुलाकडून 40 लाख रुपये घेतले होते. जमा केलेल्या पाच बँकांच्या 12 खात्यांमधून सायबर चोरट्यांनी हे पैसे काढले.

पोलिसांचा आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.

काय काळजी घ्यावी

  • ऑनलाइन कामे करून पैसे कमविण्याची संधी देणार्‍या कोणत्याही मेसेज किंवा जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
  • जेव्हा केव्हा तुम्हाला ऑफर मिळेल तेव्हा ती नीट तपासा.
  • तुमचे बँकिंग तपशील अनोळखी व्यक्तींसोबत कधीही ऑनलाइन शेअर करू नका.
  • तुम्‍ही फसवणुकीला बळी पडल्‍याचा संशय असल्‍यास तत्काळ पोलिसांना कळवा.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा