AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune pmpml bus | पुणे बसमध्ये प्रवाशांसाठी ‘ही’ नवीन सुविधा, प्रवाशांचे टेन्शन वाचणार

Pune pmpml bus | पुणे शहर वाहतूक सेवेत अनेक सुधारणा केल्या जात आहेत. आता आणखी एक नवीन सुविधा सुरु करण्यात येत आहे. प्रवाशांना या सुविधेचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यांना आता खिशात पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही.

Pune pmpml bus | पुणे बसमध्ये प्रवाशांसाठी 'ही' नवीन सुविधा, प्रवाशांचे टेन्शन वाचणार
PMPMLImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 01, 2023 | 10:02 AM
Share

पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (Pmpml ) बस सेवेने कात टाकली आहे. पुणेकरांसाठी पीएमपीएमएलने नवीन बसेस आणल्या आहेत. विना कंडक्टार बससेवा सुरु केली आहे. चालक, वाहकांना शिस्त लावली आहे. स्वत: पीएमपीएमएलचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी बसमधून अचानक प्रवास केला. त्यावेळी त्यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवारी बसमधून प्रवास करण्याचे आदेश दिले. आता आणखी एक सुविधा पीएमपीएमएलने रविवारी १ ऑक्टोंबरपासून सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना खिशात पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही.

कोणती सुविधा केली सुरु

पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेमध्ये आजपासून कॅशलेस तिकिटाची सुविधा सुरु झाली आहे. PMPML बस मध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढता आहे. रविवारी सकाळपासून PMPMLची ऑनलाईन तिकीट सेवा सुरू झाली. UPI QR कोड स्कॅन करून तिकिटांचे पैसे देता येणार आहे. तसेच गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अ‍ॅपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. आता पुणेकरांना आता पीएमपीएमएलचे तिकीट कॅशलेस पद्धतीने काढता येणार आहे.

आधी घेतली चाचणी

पुणे शहर बसमधील ऑनलाईन तिकीट सेवेची आधी चाचणी घेण्यात आली. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान बाणेर डेपो अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्वच बससेवेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सेवेमुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विना कंडक्टर धावणाऱ्या बसेसनंतर आता ऑनलाईन तिकीट प्रणाली पीएमपीएमएलने सुरु केल्यामुळे पुणेकर सार्वजनिक वाहतूक सेवेचा जास्त फायदा घेणार आहे.

प्रवासी, कंडाक्टर वाद थांबणार

सुट्या पैशांवरुन प्रवाशी आणि कंडाक्टर यांच्यात अनेक वेळा वाद होत असतात. परंतु आता ऑनलाईन तिकीट सुरु झाल्यामुळे हे वाद थांबणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सेवेचे उद्घाटन केले. या सेवेमुळे खिशात पैसे नसताना बसमधून प्रवास करता येणार आहे.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत