Sidhu Moose Wala case : ‘त्या’ तिघांनाही मुसेवाला खुनाची माहिती होती; संतोष जाधवच्या अटकेनंतर पुण्यात पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात लॉरेन्स बिष्णोई गँगचे काही ग्रुप असल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांमध्ये जी माहिती आली, त्याआधारे हा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. महाकालने जी माहिती दिली आहे. त्याची पडताळणी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

Sidhu Moose Wala case : त्या तिघांनाही मुसेवाला खुनाची माहिती होती; संतोष जाधवच्या अटकेनंतर पुण्यात पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
संतोष जाधव/कुलवंत कुमार सरंगल
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 11:34 AM

पुणे : संतोष जाधव हा मोक्का (Maharashtra Control of Organised Crime Act) गुन्ह्यात काही महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध पुणे ग्रामीण पोलीस घेत होते. सिद्धू मुसेवाला याच्या खूनानंतर (Sidhu Moose Wala case) संतोष जाधव, सौरभ महाकाल यांचा त्यात सहभाग असल्याचा मीडिया रिपोर्ट आला. याप्रकरणी आता नवनाथ सूर्यवंशी यालाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल (Kulwant Kumar Sarangal) यांनी दिली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, की संतोष जाधव, सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी या तिघांचे लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत संबंध आहेत. या तिघांना मुसेवाला खुनासंदर्भात माहिती होती, असे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी सांगितले. त्याचबरोबर तेजस शिंदे हा संतोष जाधवचा मित्र आहे, त्याचा शोध घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

लॉरेन्स बिष्णोई गँगचे राज्यात काही ग्रुप

महाराष्ट्रात लॉरेन्स बिष्णोई गँगचे काही ग्रुप असल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांमध्ये जी माहिती आली, त्याआधारे हा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. महाकालने जी माहिती दिली आहे. त्याची पडताळणी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी राज्यस्थान, दिल्ली, गुजरात येथे या आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले होते. दरम्यान, अटक आरोपींचे लॉरेन्स बिष्णोईसोबत संबंध कसे आले याचा तपास करण्यात येईल, मुसेवाला खून प्रकरणात यांचा सहभाग नेमका आहे का, हे ही तपासले जाणार आहे.

संतोष जाधवला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून संतोष जाधवच्या अटकेची कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून तो फरार होता. अटकेनंतर संतोष जाधवला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष जाधव हा सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आहे. 2021साली पुण्यातील मंचरमध्ये झालेल्या ओंकार बाणखेले हत्याकांड प्रकरणी संतोष जाधवचा गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरू होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.