Pune Ganeshotsav : यंदाचा गणोशोत्सव धुमधडाक्यात, पुणे पोलिसांनी मंडळांसाठी जारी केली नियमावली; वाचा सविस्तर…

| Updated on: Jul 27, 2022 | 6:21 PM

कोरोना कमी झालेला असला तरी गणेशोत्सवात शहरात (Pune Ganeshotsav) होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी जवळपास 39 नियम आणि अटी घातल्या आहेत. त्याचे पालन करावे लागणार आहे.

Pune Ganeshotsav : यंदाचा गणोशोत्सव धुमधडाक्यात, पुणे पोलिसांनी मंडळांसाठी जारी केली नियमावली; वाचा सविस्तर...
श्रीगणेश
Image Credit source: Dagdusheth Ganpati
Follow us on

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांकडून (Pune city police) आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. गणेश मंडळांसाठी 39 नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. यंदाचे सण उत्सव उत्साहात आणि सार्वजनिक स्वरुपात साजरे करणार असल्याचे मागेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दोन वर्ष कोरोनाच्या सावटात सर्वच सण-उत्सव केवळ घरात करावे लागले. यंदा मात्र कोरोनाचे (Covid) प्रमाण कमी झाल्यामुळे सण उत्सवांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. कोणत्याही निर्बंधांशिवाय यंदा उत्सव साजरा होत असल्याने सर्वांमध्येच आनंदाचे वातावरण आहे. कोरोना कमी झालेला असला तरी गणेशोत्सवात शहरात (Pune Ganeshotsav) होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी जवळपास 39 नियम आणि अटी घातल्या आहेत. त्याचे पालन करावे लागणार आहे. निर्बंध जरी नसले तरी नागरिकांनीही योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी मंडळांसाठी जारी केलेले नियम आणि अटी

  1. श्रींची मूर्ती स्थापना तसेच आरास संदर्भात गणेश मंडळाने आपल्या मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करणे आवश्यक
  2. श्री गणेशाच्या स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक
  3. सक्तीने अगर वाहने अडवून वर्गणी जमा करू नये.
  4. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गणपती मंडप रस्त्याचा 1/3 भाग उपयोगात आणून बांधावा
  5. हे सुद्धा वाचा
  6. मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना आवश्यक
  7. मंडप आणि गणपती स्थापनेचे आसन मजबूत असावे. श्री मूर्तीचे पाऊस तसेच आगीपासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी
  8. गणेश मूर्तीची उंची मर्यादित असावी
  9. कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना आवश्यक. वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या असाव्या
  10. हॅलोजनसारखे प्रखर दिवे सजावटीमध्ये लावण्याचे टाळावे. प्रेक्षक, सुरक्षा रक्षक यांच्या डोळ्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी
  11. रोषणाई आणि विद्युतीकरणाचे काम वायरमनकडून करून घ्यावे
  12. विद्युत प्रवाह खंडित झाल्यास जनरेटर असावे
  13. उत्सव किंवा मिरवणुकीत देखव्यांसंदर्भात पोलिसांना माहिती द्यावी
  14. संपूर्ण उत्सव काळात मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची यादी आणि रूपरेषा पोलिसांना आधीच कळवावी
  15. ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायलायकडून ठरवून देणाऱ्या अटीनुसार व्हावा
  16. श्रींची मूर्ती किंवा सजावटीची देखभाल करण्यासाठी मंडळाचे पाच कार्यकर्ते अथवा सुरक्षा रक्षक 24 तास मंडपात नेमावे
  17. आगीची दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्यावी
  18. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी मंडपासमोर योग्य दोर लावून ठेवाव्यात
  19. मंडळामध्ये अथवा मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मद्यपान करू नये
  20. मंडपामध्ये किंवा इतरत्र अनोळखी, संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे
  21. अफवा पसरवू नये, स्त्रियांनी दागिने सांभाळावे, मुलांना एकटे सोडू नये, असे सूचना फलक लावावेत
  22. वर्गणी गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांवर जबरदस्ती करू नये
  23. गणेश विसर्जन मिरवणूक विहित वेळेत संपवावी
  24. मिरवणुकीत बैलगाडी किंवा इतर गाड्यांचा वापर थांबवावा
  25. मिरवणुकीच्या दरम्यान दोन मंडळांमध्ये अंतर ठेऊ नका
  26. लहान मुलांना पाण्याजवळ नेऊ नका
  27. गुलालाचा कमीत कमी वापर करावा
  28. मिरवणुकीच्या वेळी प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन बॉक्स कमानी उभारता येतील. त्याची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसू नये.