AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune World record : पुणे शहरातील कलाकाराने केला जागतिक विक्रम, बनवला जगातील सर्वात मोठा केक

Prachi Dhabal Deb : पुणे शहरातून आणखी एक जागतिक विक्रम केला गेला आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या प्राचीने केक बनवण्याचा विक्रम केला आहे. अर्थात यापूर्वीचा विक्रम त्यांचा नावावर होता. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Pune World record : पुणे शहरातील कलाकाराने केला जागतिक विक्रम, बनवला जगातील सर्वात मोठा केक
Prachi Dhabal Deb
| Updated on: May 06, 2023 | 4:00 PM
Share

पुणे : पुणे शहरात राहणाऱ्या व्यक्तींकडून अनेक विक्रम केले जात असतात. पुणे शहरातील वेगळेपण जपताना पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम ही लोक करतात. नुकतेच जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी पुणे शहरात जन्मलेले अजय बंगा यांची निवड झाली. त्यानंतर पुणे शहरात जन्मलेले सौरभ फडके यांना किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक समारंभासाठी बोलवण्यात आले. आता आणखी एका पुणेकरने जागतिक विक्रम केला आहे. 100 किलोचा केक बनवण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आधीच होता. तो आता त्यांनी मोडला आहे.

कोण आहे कलाकार

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या पण आपल्या कामगिरीमुळे सर्वत्र प्रसिद्ध झालेल्या केक कलाकार प्राची धबल देब. प्राची यांनी पुन्हा एक नवीन विक्रम केला आहे. आता भारतीय राजवाड्यांच्या स्थापत्यकलेपासून प्रेरित होऊन प्राची यांनी 200 किलो वजनाचा केक बनवला आहे. त्यासाठी व्हेगन रॉयल आयसिंगचा वापर करण्यात आला आहे. मागील वेळेस त्यांनी मिलान कॅथेड्रल मॉडेलचा 100 किलोचा केक बनवण्याचा जागतिक विक्रम केला होता. त्यांचा हा स्वतःचा तिसरा विश्वविक्रम आहे. या केकमध्ये जास्तीत जास्त शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्सचा समावेश आहे.

रॉयल आयसिंग काय आहे

रॉयल आयसिंग हे केक सजवण्यासाठी वापरले जाणारे माध्यम आहे. प्राची म्हणाली की या अप्रतिम कलेसाठी खूप संयम आणि कौशल्य आवश्यक आहे. प्राची यांनी खासकरून भारतीय ग्राहकांसाठी व्हेगन रॉयल आयसिंग रेसिपी विकसित केली आहे.

बाहेर देशात घेतले केकचे प्रशिक्षण

प्राची यांनी रॉयल आयसिंग या किचकट कलेचे शिक्षण इंग्लडमध्ये घेतले. सामान्यतः पारंपारिक पाककलेत रॉयल आयसिंगमध्ये अंड्याचा वापर करतात. परंतु प्राची यांनी अंड्याचा वापर न करता पूर्णत: शाकाहारी विकसित केले.

कसा आहे केक

केकच्या माध्यमातून प्राचीने आता 10 फूट लांब, 4.7 फूट उंच आणि 200 किलो वजनाचा भारतीय स्थापत्य शैलीचा महाल बांधला आहे. हे भारतातील विविध शाही राजवाड्यांची भव्यता आणि वैभवशाली वैशिष्ट्ये दाखवते.

200 किलोचा केक

प्राची यांनी केवळ 3 इंच उंच शामियानापासून केक बनवण्यास सुरुवात केली होती. आता 200 किलोचा केक बनवत जागतिक विक्रम केला.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.