AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Hospital | पुणे शहरातील ससून रुग्णालयाचा विक्रम, प्रथमच शासकीय महाविद्यालयात अशी शस्त्रक्रिया

Pune Sassoon Hospital | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये कात टाकत आहेत. खासगी रुग्णालयाची बरोबरी शासकीय रुग्णालय करतील, असा प्रकार घडला आहे. एखाद्या शासकीय रुग्णालयात प्रथमच ही शस्त्रक्रिया झालीय.

Pune Hospital | पुणे शहरातील ससून रुग्णालयाचा विक्रम, प्रथमच शासकीय महाविद्यालयात अशी शस्त्रक्रिया
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 3:06 PM

पुणे | 17 सप्टेंबर 2023 : आरोग्य सेवा ही सर्वात महत्वाची असते. कोणतेही शासन असो शिक्षणसारखे महत्व आरोग्य सेवेला देत असते. त्यानंतर शासकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात सर्व सुविधा नसल्याच्या तक्रारी येत असतात. परंतु आता शासकीय रुग्णालये बदलत आहे. पुणे शहरातील ससून रुग्णालयाने हे दाखवून दिले आहे. राज्यात या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्याचा पहिला मान ससून रुग्णालयास मिळाला आहे. त्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य आले आहे.

कशी झाली शस्त्रक्रिया

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील विजय हिंमतराव पाटील यांना गुडघ्याचा त्रास होता. त्यांना गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमधील गंभीर ऑस्टियो आर्थरायटिसमुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यांना चालणे ही अवघड झाले होते. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मग त्यांची शस्त्रक्रिया रोबोटने करण्याचा निर्णय घेतला.

प्रथमच अशी शस्त्रक्रिया

रोबोटिक आर्थ्रोप्लास्टी सर्जन डॉ. राहुल पुराणिक यांच्यासमवेत डॉ. प्रवीण देवकाटे यांनी “क्युविस” रोबोटद्वारे त्यांच्यावर टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया केली. प्रथमच महाराष्ट्रातील रुग्णालयात या पद्धतीची शस्त्रक्रिया झाली. 8 सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात डिन

पुणे बी.जे.मेडीकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय ठाकूर यांनी सांगितले की, राज्यातील शासकीय रुग्णालयात प्रथमच रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करता येणार आहे. रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीचे अनेक फायदे आहेत. या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमुळे गुडघ्यातील सॉफ्ट टिश्यू लवकर बरे होतात. या शस्त्रक्रियेमुळे कमी वेदना होतात. रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे काम करत असल्यामुळे यशाचा दर जास्त होतो.

काय म्हणतात रुग्ण

शस्त्रक्रिया झालेले विजय हिंमतराव पाटील म्हणाले की, आर्थिक अडचणींमुळे मला खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. मला पुण्यातील ससून रुग्णालयात मोफत सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळाली. यामुळे मी रुग्णालयात दाखल झाला. आता शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.