ससूनच्या डॉक्टरांनी हत्यार उपसलं, रात्रीपासून संपावर जाणार, 5 प्रमुख मागण्या

Pune Sassoon Doctors strike कोरोनाचा उद्रेक सुरु असताना तिकडे पुण्याच्या ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत.

ससूनच्या डॉक्टरांनी हत्यार उपसलं, रात्रीपासून संपावर जाणार, 5 प्रमुख मागण्या
ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे
सचिन पाटील

|

Apr 16, 2021 | 12:09 PM

पुणे : कोरोनाचा उद्रेक सुरु असताना तिकडे पुण्याच्या ससून रुग्णालयातील (Pune Sassoon hospital) निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी (Doctors Strike) संपाचं हत्यार उपसलं आहे. तातडीने बेड उपलब्ध करुन मनुष्यबळ वाढवा ही या डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.

1) मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे रुग्णांवरील उपचाराचं व्यवस्थापन कोलमडून जाईल.

2) बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ, साधनसामुग्री प्रशासनाकडे आहेत का?

3) दुसऱ्या लाटेची कल्पना डिसेंबर 2020 मध्येच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नाही

4) कोव्हिड ड्युटी करणाऱ्या डॉक्टर्सला क्वारंटाईन किंवा आयसोलेशन ची सुविधा नाही त्यामुळे आमचे 80 निवासी डॉक्टर्स एका महिन्यात कोरोनाने बाधित झाले.

5)आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून त्यावर कोणतेही उपाय केले गेले नाहीत

ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड

दरम्यान, ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप आहे. एका बेडवर 2 ते 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ससूनमध्ये बेडची कमतरता आहे. नवीन इमारतीत बेड उपलब्ध असूनही तिथल्या बेडचा वापर केला जात नाही.

बेड वाढवणार

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पुण्यातील रुग्णालयात बेड्सची मोठी कमतरता भासत आहे. अशावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयात अजून 300 बेड कोविड रुग्णांसाठी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ससूनमधील कोरोना रुग्णांसाठीच्या बेड्सची संख्या 500 वरुन 800 वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालकमंत्री अजित पवार आढावा बैठक घेणार

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज घेणार आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिव्हीरची कमतरता जाणवत आहे. राज्य सरकार पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच केला आहे. अशावेळी अजित पवार कोरोना स्थितीचा आढावा घेऊन काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महापौरांचा आरोप काय?

राज्य सरकार पुण्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारलाय. पुणे शहरात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा भासत आहे. आम्ही रोज मागणी करतोय. पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केलाय. पुणे शहराला रेमडेसिव्हीर मोठ्या प्रमाणात लागत आहे. हे माहिती असतानाही त्याला पुरवठा केला जात नाही. रेमडेसिव्हीर आणि व्हेंटिलेटर संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या 

‘ससून’मध्ये अजून 300 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार, अजित पवार परिस्थितीचा आढावा घेणार    

पुण्याच्या ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; लस घेऊनही नर्सला कोरोनाची लागण

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें