काय आपण लाखो वर्षांपुर्वीचा भूतकाळ पाहू शकणार? काय पुणे आहे येथील शास्त्रज्ञाचे संशोधन

जितेंद्र झंवर, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 05, 2023 | 7:23 AM

लाखो आणि अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आकाशगंगा पाहता येईल, असा दावा केला जात आहे. या संशोधनामुळे इतिहास मागे वळून पाहता येईल.

काय आपण लाखो वर्षांपुर्वीचा भूतकाळ पाहू शकणार? काय पुणे आहे येथील शास्त्रज्ञाचे संशोधन
पुणे शास्त्रज्ञाने केलेले संशोधन
Image Credit source: social media

पुणे : रामायण, महाभारत काळात प्रत्यक्ष तुम्हाला जाता आले तर, शिवाजी महाराजांनी अफजलखानचा वध कसा केला हे पाहता, हे याची देही याची डोळ्यांनी पाहता आले तर…हे चित्रपटात नाही तर प्रत्यक्षात शक्य होणार आहे. यासंदर्भात पुण्यातील (Pune) शास्त्रज्ञाने मोठी कामगिरी केली आहे. हजारो प्रकाशवर्ष लांब असणाऱ्या आकाशगंगामधून हायड्रोजन वायूच्या उत्सर्जनात रेडिओ सिग्नल सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. नॅशनल सेंटर फॉर रेडिओफिजिक्स सेंटरचे (National Center for Radiophysics Center) संचालक यशवंत गुप्ता यांनी हा दावा केला आहे. यामुळे आम्हाला आमचा भूतकाळ पाहता येणार आहे. लाखो, कोट्यावधी वर्षांपु्र्वी असलेल्या गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगा पाहू शकणार आहे.

काय आहे संशोधन

नॅशनल सेंटर फॉर रेडिओफिजिक्सचे संचालक यशवंत गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही विश्वाच्या इतिहासाची पुनर्रचना करू शकू. आम्ही ब्रह्मांडातील दूरच्या आकाशगंगांमधून पाहू शकू. हे हायड्रोजन वायूद्वारे उत्सर्जित होणारे रेडिओ सिग्नलच्या शोधामुळे शक्य होणार आहे. आम्ही असा शोध लावला आहे ज्याद्वारे लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगांमधून हायड्रोजन वायूच्या उत्सर्जनात रेडिओ सिग्नल सापडले आहेत. त्यामुळे लाखो वर्षांपूर्वी ब्रह्मांडात असलेली आकाशगंगा आपण पाहू शकतो. याद्वारे आपण आपला भूतकाळ देखील पाहू शकतो.

लाखो आणि अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आकाशगंगा पाहता येईल, असा दावा केला जात आहे. या संशोधनामुळे इतिहास मागे वळून पाहता येईल. तसेच विश्वाच्या इतिहासाची पुनर्रचना करता येईल. यामुळे चंद्र, तारे आणि विश्वाचे रहस्य जाणून घेता येईल. ताऱ्यांच्या जगाच्या उत्पत्तीचा स्रोत काय आहे, हे सर्व समजणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI