AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील बॅनरबाजी पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीने लावले देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बॅनर

Pune News : पुणे शहरातील बॅनरजी नेहमी चर्चेत असते. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात लावलेले नवीन फ्लेक्स चर्चेत आले आहे. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आले आहे. काय म्हटलंय राष्ट्रवादीने या बॅनरमध्ये

पुण्यातील बॅनरबाजी पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीने लावले देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बॅनर
| Updated on: Jun 17, 2023 | 8:49 AM
Share

पुणे : पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. या पुणे शहरातील बॅनरबाजी नेहमी चर्चेत असते. पुणे शहरातील कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (Pimpri Chinchwad byelection) झाली होती. त्यावेळेस कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन भाजपच्या विरोधात बॅनर लागले होते. आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा…या बॅनरची चर्चा संपूर्ण निवडणूक काळात राज्यभर चालली. त्यानंतर सत्तासंघर्षावर सरन्यायाधिशांना उद्देशून बॅनर लावण्यात आले होते. लोकसभा पोटनिवडणुकीवरुन भावी खासदार म्हणून सर्वच पक्षांकडून बॅनर लावण्यात आले. आता राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यांसंदर्भात बॅनर लावले आहे.

काय आहे बॅनरमध्ये

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमध्ये काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र सुरक्षित आहे का?

  • इथे महिला सुरक्षित नाहीत…चालू लोकलमध्ये बलात्कार
  • इथे व्यापारी सुरक्षित नाहीत… खंडणीखोर व कोयता गँगची दहशत
  • इथे नेते सुरुक्षित नाहीत…विरोधी पक्षातील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे
  • इथे पत्रकार सुरुक्षित नाहीत…पत्रकारांना गाडीखाली चिरडलं जाते
  • इथे रोज जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय…तरीही कुठलीही ठोक सरावाई नाही
  • भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून रोज जनसामान्यांची फसवणूक होत आहे…

काय केली मागणी

राज्यात बलात्कार, कोयता गँगची दहशत, वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे , पत्रकारांना गाडीने चिरडणे, जाती धर्मात जाणीवपूर्वक दंगली घडवणे असे प्रकार रोजचे झाले आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही अन् परिस्थिती हाताळण्यात गृहमंत्री असमर्थ आहे, अशा आशयाचे बॅनर संबंध पुणे शहरात लावण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सलचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप हूमे यांनी हे बॅनर लावले आहे. त्यांनी बॅनर मार्फत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

वसंत मोरे यांचे बॅनर चर्चेत

मनसेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून नुकतेच बॅनर लागले होते. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी गुरुवारी माऊलीच्या पालखीचे दर्शन घेतले. यानंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, माऊलींना मी साकडं घातले आहे. माऊलींना म्हटले की, माझा पक्ष वाढो… पुढच्या वर्षी माऊलींच्या दर्शनाला येताना पुण्याचा खासदार होऊन यायला आवडेल…यामुळे आता पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांनी तयारी सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा दिला नाही तर मनसेकडून वसंत मोरे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.