पुण्यात मोठी कारवाई! रातोरात 21 जणांना बसवलं घरी, 8 पोलीस अधिकारी अन्… नेमकं काय घडलं?

पुणे हादरवणारी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक झाले आहे. त्यांनी एका रात्रीत 21 जणांना निलंबीत केले आहे.

पुण्यात मोठी कारवाई! रातोरात 21 जणांना बसवलं घरी, 8 पोलीस अधिकारी अन्... नेमकं काय घडलं?
सांकेतिक फोटो
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 30, 2026 | 11:07 AM

पुण्याच्या ग्रामीण भागात अवैधरित्या तयार होणारी विषारी गावठी दारू थेट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सप्लाय केली जात होती. या गावठी दारूच्या भट्ट्यांवर आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी काही संघटना आणि ग्रामस्थांनी पोलिसांकडे वारंवार पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या. अगदी विषारी दारूने भरलेल्या गाड्या पकडून देऊनही पोलिसांनी मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप करण्यात आहे. जर दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी या रॅकेटवर कडक कारवाई केली असती, तर आज या १६ जणांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यानंतर आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणावर कारवाई करत रातोरात 21 जणांना घरी बसवण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मोठी खळबळ उडाली. गेल्या दोन दिवसांत हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी येथील तब्बल १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या ४ ते ५ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र, त्यातील काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

21 जणांवर कारवाई

या भयंकर घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, बेकायदा दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या विभागातील तब्बल १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील ‘J’ आणि ‘F’ विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग ‘अॅक्शन मोड’मध्ये

या हत्याकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आला आहे. पुणे परिसरातील बेकायदा दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या धडक कारवाईदरम्यान, बाजारात विक्रीसाठी जाणारी सुमारे ६०० लिटर मिथेनॉलमिश्रित घातक दारू जप्त करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

Follow Us