AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का; वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी

Vasant More Resignation From MNS : पुण्यातील वरिष्ठ नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहित मनसेला जय महाराष्ट्र करत असल्याचं जाहीर केलं आहे. अखेरचा जय महाराष्ट्र... साहेब मला माफ करा..., असं ते म्हणालेत. वाचा...

लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का; वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 12, 2024 | 7:22 PM
Share

प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 12 मार्च 2024 : पुण्यातील राजकारणात दबदबा असणारे आणि पुणे मनसेचा चेहरा असणारे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का… वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …, असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे. आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे.

वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी

वसंत मोरे हे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील महत्वाचे नेते आहेत. मनसेच्या मोजक्या नेत्यांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख व्हायचा. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छूक आहेत. राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या वारंवार भेटीही झाल्या आहेत. मात्र मनसेकडून मोरेंना उमेदवारी दिली जाणार की नाही? याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते कोणत्या पक्षात जाणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

वसंत मोरे यांनी पत्र लिहित मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांच्या फोटोसमोर नतमस्तक होतानाचा फोटो आणि राजीनाम्याचं पत्र वसंत मोरे यांनी ट्विट केलं आहे. अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा… असं ते ट्विटमध्ये म्हणालेत.

वसंत मोरे यांचं राजीनाम्याचं पत्र

प्रति, मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

विषय: माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद..!

आपला विश्वासू, वसंत (तात्या) मोरे कात्रज पुणे.

सकाळी नाराजीची फेसबुक पोस्ट

एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आज सकाळी फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आता अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल