AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | पुणे पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून प्रकरणात महत्वाचे अपडेट, खुनाचे कारण आले समोर

Pune Crime Vijay Dhume Murder | पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी झालेल्या खुनाचा तपास लागला आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार, पाच जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात युवकाची हत्या केली होती.

Pune Crime | पुणे पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून प्रकरणात महत्वाचे अपडेट, खुनाचे कारण आले समोर
Pune Vijay dhumeImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 02, 2023 | 11:31 AM
Share

अभिजित पोते, पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा विजय ढुमे याचा निर्घृणपणे खून झाला होता. पुणे शहरातील लांबलेली विसर्जन मिरवणूक नुकतीच पूर्ण झाली होती. त्यानंतर संध्याकाळी 6:45 वाजता खुनाचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा तपास वेगाने करत पोलिसांनी आरोपींना पकडले आहे. अवघ्या 36 तासांचा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या.

कसा झाला होता विजय ढुमेवर हल्ला

पुणे येथील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा विजय ढुमे याचा शुक्रवारी खून झाला होता. सिंहगड रस्त्यावर असलेल्या कॉलिटी लॉजमधून विजय ढुमे संध्याकाळी बाहेर पडत होते. त्यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. काही समजण्यापूर्वी हल्लेखोरांनी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने जोरदार वार केले. विजय ढुमे यांच्या डोक्यावर जोरदार मार बसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी वेगाने केला तपास

विजय ढुमे याचा खून झाल्यानंतर अवघ्या काही 36 तासांत पुणे पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. यासाठी पोलिसांनी 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणातील पाच आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासातून समोर आले आहे. विजय ढुमे यांचे जुने प्रेम प्रकरण त्यांच्या खुनासाठी निमित्त ठरले. विजय ढुमे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा होता. त्यांचे अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध होते.

पोलिसांनी विजय ढुमे याच्या प्रियेसीकडे…

पोलिसांनी विजय ढुमे याची जुनी प्रियेसीकडे कसून चौकशी केली. त्यानंतर तिने तिचा नवीन प्रियकर संदीप तुपे आणि इतरांच्या मदतीने हा खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात सुजाता समीर ढमाल (राहणार, किरकिटवाडी, पुणे), तिचा प्रियकर संदीप दशरथ तुपे, सागर संजय तुपसुंदर, प्रथमेश रामदास खंदारे आणि एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...