AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | पुणे शहरात खुनाचा थरार, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाच्या खून प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Pune Crime Vijay Dhume Murder | पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणूक लांबली होती. तब्बल २९ तास मिरवणूक सुरु होती. त्यानंतर बंदोबस्तात असलेले पोलीस थोडा आराम करण्याचा तयारीत होते. परंतु संध्याकाळी चार, पाच जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात युवकाची हत्या केली.

Pune Crime | पुणे शहरात खुनाचा थरार, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाच्या खून प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
vijay dhumeImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 30, 2023 | 10:58 AM
Share

पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात विग्नहर्ता गणराया असताना दहा दिवस मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु गणरायाचे विसर्जन झाले आणि हल्लेखोरांचा हैदौस सुरु झाला. पुणे शहरातील सिंहगड रोडवर विसर्जन मिरवणुकीनंतर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली. सिंहगड पोलीस रस्त्यावर असलेल्या कॉलिटी लॉजच्या पार्किंगमध्ये खुनाचा थरार रंगला. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा विजय ढुमे याचा निर्घृणपणे शुक्रवारी संध्याकाळी 6:45 वाजता खून झाला. आता या प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.

कसा झाला खून

विजय ढुमे (वय -43, रा. सिंहगड रस्ता,पुणे) सिंहगड रस्त्यावरील कॉलिटी लॉजमधून बाहेर पडत असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर वार केले. हल्लेखोरांना बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सामानांचा वापर खुनासाठी केला. लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने त्याच्यावर केले गेले. त्यांच्या डोक्यावर मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

खुनानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

गणेश विसर्जन मिरवणुकीतील 29 तासांचा बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचारी थकले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यावर खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले. आरोपींना पकडण्यासाठी लागलीच सूत्र हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार ते पाच आरोपी दिसत आहे.

विजय यांचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध

विजय ढुमे हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता. त्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते. अनेक जणाबरोबर त्याची उठबस होती. त्याचा खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं