Pune water cut : पुणेकरांनो, पाणी जरा जपूनच वापरा; गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा राहणार बंद, काय म्हटलंय महापालिकेनं? वाचा…

विद्युत पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक तसेच तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (2 जून) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (3 जून) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

Pune water cut : पुणेकरांनो, पाणी जरा जपूनच वापरा; गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा राहणार बंद, काय म्हटलंय महापालिकेनं? वाचा...
पाणीपुरवठा (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:00 PM

पुणे : तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहरातील संपूर्ण भागातील पाणीपुरवठा (Water supply) गुरुवारी 2 जूनला बंद राहणार आहे. तर शुक्रवारी 3 जूनला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) दिली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे तसेच सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पर्वती जलकेंद्र, एस. एन. डी. टी चार जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जवेंद्र येथील विद्युत पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक तसेच तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (2 जून) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (3 जून) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी मिळणार आहे, असे महापालिकेतर्फे (PMC) कळविण्यात आले आहे.

पर्वती जलकेंद्र भाग –

शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, इंदिरानगर परिसर, दत्तवाडी परिसर, ज्ञानेश्वर नगर, लोकमान्य नगर, स्वारगेट परिसर, शिवाजी नगर परिसर, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, पर्वती गाव, कोथरूड परिसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, राजेंद्रनगर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46 कोंढवा खुर्द

चतु:श्रृंगी, एस. एन. डी. टी., वारजे जलकेंद्र

शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्बेरोड परिसर, भुसारी कॉलनी, एरंडवणा, कोथरुड, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.

हे सुद्धा वाचा

लष्कर जलकेंद्र पंपिंग भाग

लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग

मुळा रोड, खडकी, एमईएस, हरिगंगा सोसायटी, एचई फॅक्टरी इत्यादी.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.