Pune News | पुणेकरास चहा पिणे पडले महागात, जीवच गमावून बसला

Pune Accident | पुणे शहरात विचित्र अपघात घडला. कसबा पेठेतील ३२ वर्षीय तरुण चहा पिण्यासाठी झाडाखाली थांबला होतो. परंतु त्याचा तो शेवटचा चहा ठरला. या प्रकरणास पुणे मनपा अधिकारी दोषी असल्याचा आरोप तरुणाच्या मित्र आणि नातेवाईकांनी केला आहे.

Pune News |  पुणेकरास चहा पिणे पडले महागात, जीवच गमावून बसला
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 9:20 AM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 27 नोव्हेंबर 2023 | चहा म्हणजे पुणे शहरातील अमृततुल्य आहे. पुण्यात सर्वत्र चहाच्या दुकानांना अमृततुल्य म्हटले जाते. पुण्यातच नाही तर अनेक ठिकाणी चहा हे आवडते पेय आहे. परंतु एका पुणेकरास चहा पिणे चांगलेच महागात पडले. या प्रकारामुळे तो तरुण जीव गमावून बसला. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील ही घटना म्हणजे ‘कावळा बसवा आणि फांदी तुटावी’, म्हणीप्रमाणे झाली. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे.

काय घडली घटना

पुणे येथील कसबा पेठेतील रहिवाशी अभिजित गुंड (३२) यांचा चहा पीत असताना मृत्यू झाला. पुणे येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या ठिकाणी झाडाखाली अभिजित गुंड चहा पीत उभे होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात झाडाची फांदी पडली. त्यांना गंभीर मार लागला. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यांना रिक्षामधून रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अभिजित गुंड हे चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आले आणि त्यांचा तो शेवटचा चहा ठरला.

हे सुद्धा वाचा

अपघाताला पुणे मनपा अधिकारी जबाबदार

अभिजित गुंड यांच्या मृत्यूला पुणे महानगरपालिकेतील विश्रामबाग क्षत्रीय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी दोषी आहेत. अधिकाऱ्यांकडे या झाडांसंदर्भात वारंवार तक्रार करून देखील प्रशासन विभाग ढिम्म होते. अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी मृत्यू झालेल्या गुंड यांच्या मित्रांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी,कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.