Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारल्या 5 महापुरुषांची मानवी प्रतिकृती

हा उपक्रम आज सकाळी संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांमध्ये 3,700 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारल्या 5 महापुरुषांची मानवी प्रतिकृती
ZEAL COLLEGE
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 26, 2023 | 2:57 PM

पुणे – झील एज्युकेशन सोसायटीने (ZEAL COLLEGE) अनोखा विक्रम केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2023) औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी (Student) देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृतीद्वारे मानवंदना दिली.

हा उपक्रम आज सकाळी संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांमध्ये 3,700 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 500 हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून या उपक्रमाची तयारी सुरू केली होती.

या कार्यक्रमाद्वारे “एकता आणि शांतता ” हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना दिली.

या कार्यक्रमाचे सगळी व्हिडीओ व्हायरल झाले असून कौतुक होत आहे.