दहावीच्या विद्यार्थिनींना पुणे जिल्हा परिषदेचं गिफ्ट, प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रत्येकाला 5 हजार रुपये

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार 10 वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. बक्षीसाची रक्कम थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.

दहावीच्या विद्यार्थिनींना पुणे जिल्हा परिषदेचं गिफ्ट, प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रत्येकाला 5 हजार रुपये
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 9:22 AM

पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यीनींना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार 10 वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. बक्षीसाची रक्कम थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केलीय.

पुणे जिल्हा परिषदेने याआधी इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थीनींनाही अशीच प्रोत्साहन रक्कम देऊ केली होती. आता बारावीनंतर दहावीच्या मुलींनाही हे बक्षीस दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलींच्या बँक खात्यावर त्यांच्या बक्षीसाची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी याबाबत माहिती दिलीय.

दहावीची परीक्षा कधी?

बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा बुधवारी 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बारावीची परीक्षा कधी ?

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अब्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

प्रात्याक्षिक परीक्षा कधी घेतली जाणार?

इयत्ता दहावीची प्रात्याक्षिक आणि तोंडी, श्रेणी परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेतली जाईल. दुसरीकडे बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान घेतली जाईल.

सविस्तर वेळापत्रक कुठं पाहायचं?

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेलं वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून महाविद्यालय आणि शाळांकडे देण्यात येणार वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

सगळंच पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका, दादांनी दरडावलं, शाळा कधी सुरु होणार? दादा म्हणतात..

पुण्यात घटस्फोटासाठी जातपंचायतऐवजी न्यायालयात गेल्यानं बहिष्कार, अंनिसच्या पाठपुराव्यानं 14 जणांवर गुन्हा दाखल

अबब! काय सांगता, कापडी पिशव्यांसाठी पुण्याच्या नगरसेवकांकडून तब्बल 11 कोटींची उधळपट्टी!

व्हिडीओ पाहा :

Pune ZP announce awards for SSC girl student 5 thousand rupees

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.