अबब! काय सांगता, कापडी पिशव्यांसाठी पुण्याच्या नगरसेवकांकडून तब्बल 11 कोटींची उधळपट्टी!

पुण्यातल्या नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत तब्बल 11 कोटी 57 लाख रुपये हे केवळ ज्युट आणि कापडी पिशव्या (Cloths Bags) वाटप करण्यावर खर्च केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

अबब! काय सांगता, कापडी पिशव्यांसाठी पुण्याच्या नगरसेवकांकडून तब्बल 11 कोटींची उधळपट्टी!
पुणे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 3:02 PM

पुणे : पुणे महापालिका (Pune Municipal Corporation)  निवडणुकीचे (PMC Elections) पडघम लवकरच वाजण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांकडून (Pune Corporators) आपापल्या वॉर्डातल्या मतदारांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशात पुण्यातल्या नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत तब्बल 11 कोटी 57 लाख रुपये हे केवळ ज्युट आणि कापडी पिशव्या (Cloths Bags) वाटप करण्यावर खर्च केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुण्यातील परिवर्तन संस्थेने पुणे महानगरपालिकेतील 162 नगरसेवकांचा मागील चार वर्षाच्या कामाचा लेखाजोखा घेत त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये नगरसेवकांनी केलेल्या विविध कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation corporators have spent Rs 11 crore to distribute cloth bags)

11 कोटी 57 लाख रुपयांच्या कापडी पिशव्यांचं वाटप

पुणे महानगरपालिकेतल्या नगरसेवकांकडून आपापल्या वॉर्ड आणि प्रभागामध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यामध्ये सामाजिक उपक्रमांबरोबर अनेकदा संसारोपयोगी साहित्यही वाटलं जातं. अशाच उपक्रमांमधून पुण्याच्या 162 नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात कापडी आणि ज्यूटच्या पिशव्यांचं वाटप केलेलं आहे. या पिशव्यांवर नगरसेवकांनी तब्बल 11 कोटी 57 लाख 30 हजार 999 रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे.

चार वर्षांत 90 कोटींचा निधी खर्च

पुणे महापालिकेच्या 162 नगरसेवकांनी मागील चार वर्षाच्या काळात 90 कोटी 90 लाख 87 हजार 326 रुपये खर्च केले आहेत. यातील सर्वाधिक 16.8 टक्के म्हणजेच 15 कोटी 31 लाख 42 हजार रुपये एवढी रक्कम ड्रेनेज किंवा पावसाळी कामे, गटारे अशा कामांवर खर्च करण्यात आली आहे. प्रभागांमध्ये सफाई करणे किंवा राडारोडा उचलणे अशा कामांवर 5 कोटी 71 लाख 54 हजार 799 इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.

आपत्ती, कोविडविषयक कामांवर साडेसहा कोटींचा खर्च

पुणे महापलिकेतल्या नगरसेवकांनी आपत्ती मदतकार्य किंवा कोविड विषयक कार्यांवर 6 कोटी 59 लाख 51 हजार खर्च केले आहेत. तर पथदिवे-विद्युतविषयक कामांवर खर्च केलेली रक्कम 5 कोटी 52 लाख 31 हजारांच्या घरात आहे.

अनावश्यक कामांवर कोट्यवधींच्या खर्चाची शक्यता

प्रभागातल्या वेगवेगळ्या कामांसाठी महापालिकेकडून आलेला निधी वापरण्यात येतो. अनेकदा आलेला निधी परत जाऊ नये यासाठी अनावश्यक कामं हाती घेतली जातात. फूटपाथ, रस्ते, नव्याने केले जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे, उद्यानांची दुरूस्ती किंवा पिशव्या आणि इतर साहित्यांचं वाटप केलं जातं. सोसायट्यांबाहेर पथदिवे, फलक, बसथांबे याची उभारणी किंवा नुतनीकरणासाठी अट्टाहास धरला जातो. अनेकदा गरज नसताना अशा संकल्पनांवर कोट्यवधींची उधळण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खर्चासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी सामाजिक संघटनांकडून सातत्याने होत आहे.

(Pune Municipal Corporation corporators have spent Rs 11 crore to distribute cloth bags)

इतर बातम्या :

Supriya Sule | केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरुन राज्यातील वातावरण बिघडलं जातंय : सुप्रिया सुळे

Mumbai | 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय, अन्य राज्यातील स्थितीवरही लक्ष : बच्चू कडू

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.