AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune ZP-Panchayat Samiti Election Results Update : इंदापूर ते मावळ, पुण्यात 73 जागांचा संपूर्ण निकाल, तुमच्या तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावांची यादी

Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Election Results 2026 Updates : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाने ५५ पैकी ३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. खेड, आंबेगाव आणि इंदापूरमधील विजयी उमेदवारांची सविस्तर यादी आणि पक्षनिहाय बलाबल येथे पाहा.

Pune ZP-Panchayat Samiti Election Results Update : इंदापूर ते मावळ, पुण्यात 73 जागांचा संपूर्ण निकाल, तुमच्या तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावांची यादी
ajit pawar sharad pawar
| Updated on: Feb 09, 2026 | 3:22 PM
Share

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकूण ७३ जागांपैकी ५५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यात राष्ट्रवादीने ३९ जागांवर मुसंडी मारत सत्तेचा ३७ हा जादूई आकडा पार केला आहे. या विजयामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात अजित पवार यांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पक्षांची सद्यस्थिती: कोणाला किती जागा?

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ३९
  • भाजप: ०८
  • शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ०४
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): ०३
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट): ०१

काँग्रेस व अपक्ष: 0

तालुकानिहाय विजयी उमेदवारांची सविस्तर यादी

१. खेड तालुका (जिल्हा परिषद)

खेडमध्ये ठाकरे गटाने राष्ट्रवादीला जोरदार टक्कर दिली आहे.

  • समीर सुपे (राष्ट्रवादी – वाडा)
  • तनुजा घनवट (उबाठा – कडून)
  • दिप्ती भोगाडे (उबाठा – रेटवडी)
  • विजयसिंह शिंदे (उबाठा – पिंपळगाव)
  • गणेश अरगडे (उबाठा – मेदनकवाडी)
  • सुनीता बुटे (राष्ट्रवादी – पाईट)
  • गणेश बोत्रे (राष्ट्रवादी – नाणेकरवाडी)
  • विनया मुंगसे (उबाठा – कुरुळी)

२. आंबेगाव तालुका

  • विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी – पारगाव)
  • विष्णू काका हिंगे (राष्ट्रवादी – अवसरी बु.)
  • शीला राजेंद्र लोहोकरे (राष्ट्रवादी – शिनोली)
  • प्रीती प्रवीण थोरात (राष्ट्रवादी SP – कळंब)
  • सुवर्णा देविदास दरेकर (शिवसेना शिंदे गट – घोडेगाव)

३. दौंड आणि भोर

  • तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी – केडगाव बोरीपारधी): माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव विजयी.
  • राजेश बोडके (राष्ट्रवादी – भोलावडे गण)
  • प्रवीण जगदाळे (राष्ट्रवादी – भोलावडे-शिंद गट)

४. इंदापूर आणि मावळ

  • यशराज जगदाळे (राष्ट्रवादी – वडापुरी-माळवाडी): मोठ्या मताधिक्याने विजयी.
  • दिपाली गव्हाणे (राष्ट्रवादी SP – रांजणगाव सांडस तळेगाव): आमदार बापू पठारे यांच्या कन्या विजयी.
  • विद्या भुजबळ (भाजप – तळेगाव गण): विजयी.

पुण्यातील पंचायत समितीचा निकाल काय?

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पंचायत समित्यांचे निकालही अत्यंत चुरशीचे ठरले आहे. यात विविध तालुक्यांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. खेड पंचायत समितीत शिवसेना ठाकरे गटाने १२ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला येथे केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली २० वर्षांपासूनची सत्ता पुन्हा एकदा अबाधित राखली आहे, तर इंदापूरमध्ये वडापुरी आणि माळवाडी गणातून यशराज जगदाळे, अर्चना खबाले आणि कल्पना पाटील या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवारांनी आपली आघाडी विजयात रूपांतरित करत वर्चस्व निर्माण केले आहे. भोरमध्ये भोलावडे गणातून राष्ट्रवादीचे राजेश बोडके विजयी झाले असून, एकंदरीत ग्रामीण भागातील स्थानिक गणांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी