BabaSaheb Purandare: बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो; राज ठाकरेंकडून गौरवोद्गार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली आहे. पण, त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तेज तसंच आहे. (Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare On Birthday)

BabaSaheb Purandare: बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो; राज ठाकरेंकडून गौरवोद्गार
Raj Thackeray
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 29, 2021 | 1:25 PM

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली आहे. पण, त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तेज तसंच आहे. वयामुळे शरीर थोडसं थकलंय. पण त्यांचं बोलणं, स्मरणशक्ती आणि संदर्भ देण्याची हातोटी यात काहीही फरक पडलेला नाही, असं सांगतानाच बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो, असं गौरवोद्गार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले. (Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare On Birthday)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली आहे. राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गौरवोद्गार काढले. बाबासाहेबांच्या त्यांच्या लिखाणातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानात जे सापडलं आणि जे खरं आहे. ते त्यांनी लोकांसमोर मांडलं. एखादी दंतकथा असेल तर ते तसं सांगतात. या कथेला आधार नाही हे ते सांगतात. म्हणूनच घोरपडीचं उदाहरण त्यांच्या पुस्तकात कधीच नसते, असं सांगतानाच आज एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेतून ते एखादा ऐतिहासिक संदर्भ सांगत असतात. पण ते सांगत असताना ते आजच्या घटनेशी याचा संबंध आहे, असं सांगत नाहीत. ते तुम्ही समजून घ्यायचं असतं किंवा जाणून घ्यायचं असतं. जाणून घेणं हे आपलं काम आहे. सांगणं हे त्यांचं काम आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा गाठीभेटी होतात, तेव्हा ते इतिहासातील नवीन साक्षात्कार घडवत असतात, असं राज म्हणाले.

समाजानं कसं वागलं पाहिजे, हे शिकवतात

शिवचरित्रं अनेकांनी लिहिली. पण त्या शिवचरित्रातून समाजानं कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सावध असलं पाहिजे, या गोष्टी बाबासाहेबांकडून ऐकायला मिळायला त्या विलक्षण आहेत. आजच्या जगात महाराज आपल्याला काय सांगतात हे बाबासाहेब आपल्याला सतत सांगत असतात. तिच नवीन गोष्ट आणि अनोखी गोष्ट मला बाबासाहेबांमध्ये दिसून आली, असं ते म्हणाले.

आनंदी आहे, पण समाधानी नाही

परवा त्यांना भेटलो. ते म्हणाले, आनंदी आहे. पण समाधानी नाही. ते खरंच आहे. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटलो, त्या त्यावेळी नवीन खजाना भेटल्याचं मला प्रत्येकवेळी वाटलं. आपल्या छत्रपतींबद्दल अजून नवीन माहिती, इतिहासाबद्दल आणखी काही नवं बाबासाहेबांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. मी लहानपणापासून त्यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत. शिवछत्रपतींचं चरित्रं अनेकदा वाचून झालं आहे. मी ज्या ज्यावेळी त्यांचं व्याख्यान ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटतं ते नुसतं शिवचरित्रं सांगत नाहीत. 2021मध्ये आपण कसं जगलं पाहिजे. कसं सावध असलं पाहिजे, म्हणजे या देशातील हिंदूंनी मराठी समाजाने किती सावध असलं पाहिजे, किती सतर्क असलं पाहिजे हे या इतिहासातून मला वाटतं बाबासाहेब सतत सांगण्याचा प्रयत्न सर्वांना करत आले. त्यातून तो बोध घेणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

आडनावं कशी आली?

‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ हे शब्द म्हणजे तेव्हाची मराठी आहे. शब्द तेच आहेत. फक्त त्यात ळ किंवा ल मधला फरक आहे. ‘कैसी’ हा शब्द तिथे लिहिला ‘कैची’. तो तेव्हाचा मराठी शब्द आहे. तो आता घ्यावा का? आताच्या मराठीप्रमाणे ‘कैसी’ त्या संदर्भात लिहावा, याबाबत त्यांच्याशी बोलत होतो, असं त्यांनी सांगितलं. आपल्याकडे अनेक शब्द आहेत ते फारसी आहेत. पण ते आपल्याला माहीत नाहीत. अनेक आडनावं कशावरून आली हे माहीत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर हे ‘फडणवीस’ हे मुळात अडनाव नाही. ते मूळचं पर्शियन अडनाव आहे ‘फर्द नलीस’. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. म्हणजे ‘फर्द नलीस’. नंतर ते फडावर लिहिणं आलं. म्हणून ते फडणवीस आलं. आडनावं कशी असतात… मला त्यात रस आहे. हे कुठून आले? कसे आले? महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कुठून आले? कसे आले? चपाती, पोळी कुठून आले? महाराष्ट्रात गहू नव्हता. मग गहू आला कुठून? अशा अनेक गोष्टी असतात त्या भूगोल आणि इतिहासाशी संबंधित असतात. बाबासाहेब या विषयावर माझ्याशी बोलले त्याबद्दल मला भाग्यवंत समजतो, असंही ते म्हणाले. (Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare On Birthday)

संबंधित बातम्या:

चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही: राज ठाकरे

BabaSaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन

सरकारमध्ये आंतरविरोधाला सुरुवात, सध्या एक्स्ट्राऑर्डिनरी संकट, एक्स्ट्राऑर्डिनरी निर्णय घ्या : देवेंद्र फडणवीस

(Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare On Birthday)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें